Bhindi Fry recipe: भेंडीची भाजी नाही, तर फ्राय कसे बनवतात?

भेंडी फ्राय,एक सहज बनवता येणारी एक स्वादिष्ट डिश आहे.
Bhindi Fry recipe
Bhindi Fry recipeEsakal

बहुतेक गृहिणीना सकाळी उठल्यावर एक प्रश्न पडतो की, आपल्या लहान मुलांना शाळेच्या टिफिन मध्ये दररोज काय भाज्या बनवून द्याव्यात ? याच प्रश्नाच उत्तर शोधण्यासाठी, आम्ही तुम्हाला काही उत्तम रेसिपीचे पर्याय सांगणार आहोत.

आजची रेसिपी आहे भेंडी फ्राय,एक सहज बनवता येणारी एक स्वादिष्ट डिश आहे. ही फारच चवदार व रूचकर असते. ही पराठा, नान, पोळी, तंदूरी रोटी, भात, मसाले भात, व्हेज बिर्यानी यापैकी सगळ्याच पदार्था सोबत भेंडी फ्राय शानदार लागते. मग चला आज भेंडी फ्राय कशी बनवतात ते पाहुया.

भेंडी फ्रायसाठी लागणारे साहित्य:

1) अर्धा किलो ताजी धुतलेली भेंडी

2) दोन कांदे (बारीक लांब कापलेले)

3) हळद

4) आमचूर पावडर

5) धनी पावडर

6) गरम मसाला

7) मीठ

8) तेल (फ्राय करण्यास )

9) शेंगदाणा कूट

Bhindi Fry recipe
भाजीपोळी खाऊन कंटाळलात, एकदा हे वरण फळ ट्राय करून बघा...

कृती:

भेंडी स्वच्छ पुसून घेऊन, नंतर तिचे उभे काप करुन घ्यावे.भेंडीचे काप तयार झाल्यानंतर त्यात आपल्या अंदाजाने हळद, आमचूर पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, मिठ हे सगळे भेंडीच्या कापावर टिकावे.

हे मसाला टाकलेले भेंडीचे काप अर्धा तास फ्रिज मध्ये ठेवावे.अर्धा तासानंतर बाहेर काढुन त्यात थोडासा शेंगदाणा कुट घालावा.नंतर कढई मध्ये थोडेसे तेल टाकून त्यात भेंडी टाकून दयावी.

मंद गॅसवर भेंडी चांगली कूरकूरीत फ्राय करून घ्यावी.8 ते 10 मिनीटात भेंडी चांगली कूरकूरीत होते.अशा रितीने आपली भेंडी फ्रायची रेसिपी तयार झालेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com