

Bhogi Bhaji Recipe:
Sakal
Bhogi Bhaji Recipe: मकर संक्रांतीच्या आधी येणारा भोगीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या खास दिवशी बनवली जाणारी भोगीची भाजी आणि गरमागरम भाकरी हे या सणाचं प्रमुख आकर्षण असतं. हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या ताज्या भाज्यांचा वापर करून तयार केली जाणारी ही भाजी केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असते. यात हंगामी भाज्यांचा समावेश असतो. आजही अनेक घरांमध्ये मोठी माणसे असेल तर पारंपरिक पद्धतीने ही भाजी आणि भाकरी बनवली जाते.