esakal | ब्लुबेरी खा वेगवेगळ्या पदार्थांबरोबर, 'या' आहेत टीप्स
sakal

बोलून बातमी शोधा

ब्लुबेरी

ब्लुबेरी खा वेगवेगळ्या पदार्थांबरोबर, 'या' आहेत टीप्स

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : ब्लुबेरी असे फळ आहे, जे खाणे स्वादिष्ठ असते. त्यातून आपल्या अधिक पोषक तत्त्वेही मिळतात. त्याच्या सेवनाने तुमचे हृदय - मेंदू तसेच प्रतिकारशक्तीवर ही सकारात्मक प्रभाव पाडते. यामुळेच बहुतेक लोक आपल्या आहारात आवडीने समावेश करतात. मात्र कोणतेही फळ प्रत्येक दिवस खाण्याने कंटाळा येऊ शकतो. अनेकदा खायची इच्छा होत नाही आणि ते खाणे आपण टाळतो. अस तुमच्या बाबत घडून नये म्हणून तुम्ही एकच फळ किंवा भाजी वेगवेगळ्या रुपात खाण्याचा प्रयत्न करा. याने तुम्हाला प्रत्येक दिवशी नवीन व्हरायटी खायला मिळेल. तर चला आम्ही तुम्हाला ब्लूबेरी खाण्याच्या पद्धतीविषयी सांगणार आहोत...

पॅनकेक आणि ब्लुबेरी

पॅनकेक आणि ब्लुबेरी

पॅनकेक

नाष्ट्यासाठी पॅनकेक एक त्वरित आणि आरोग्यदायी पर्याय आहे. तुम्ही पॅनकेक बनवताना त्यात काही ताजे ब्लुबेरी कापून टाकू शकता. जर तुमच्याकडे फ्रोजन ब्लुबेरी असेल तर तीही पॅनकेकमध्ये टाकले जाऊ शकते. यामुळे चवीत तर बदल होईलच. पण त्यात चटपटीतपणाही वाढेल.

स्मुदी आणि ब्लुबेरी

स्मुदी आणि ब्लुबेरी

बनवा स्मुदी

स्मुदी खूपच रिफ्रेशिंग असते. जर तुम्हाला ब्लुबेरी आवडत असेल तर स्मुदीत टाकू शकता. तुम्हाला हे खूप आवडेल.

फ्रूट चाट आणि त्यात ब्लुबेरी

फ्रूट चाट आणि त्यात ब्लुबेरी

फ्रूट चाटचा वाढवा स्वाद

चांगल्या आरोग्यासाठी फळाच्या रसाऐवजी ब्लूबेरी खाण्याचा सल्ला दिला जातो. याने तुमची कॅलरी नियंत्रणात राहतेच तसेच तुम्हाला फायबर व इतर पोषक तत्त्वेही मिळतात. त्यामुळे तुम्ही फळ हे चाटच्या रुपात खाऊ शकता. तुम्ही सफरचंदपासून द्राक्षांसह ब्लूबेरीही या चाटमध्ये टाकून खाऊ शकता.

आईस्क्रिम आणि ब्लुबेरी

आईस्क्रिम आणि ब्लुबेरी

आईस्क्रिम बनवा क्रंची

आईस्क्रिम खायला प्रत्येकाला आवडते. मग ते लहान असो की मोठे. मात्र तुम्ही घरी आईस्क्रिम बनवत असाल तर त्यात अतिरिक्त क्रंच व फ्लेवर टाकण्यासाठी त्यात काही ब्लुबेरीही टाकू शकता.

ब्लुबेरीचा बिस्किट बनवण्यासाठी वापर केला जातो.

ब्लुबेरीचा बिस्किट बनवण्यासाठी वापर केला जातो.

बनवा बिस्किट

जर तुम्हाला बेकरीचे पदार्थ बनवायला आवडत असेल तर त्याचा ब्लुबेरीसह आनंद घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीच्या आवडत्या बिस्किट रेसिपीत ब्लुबेरीचा वापरता येऊ शकते. त्यानंतर तुम्ही बिस्किट बेक करण्यासाठी ठेवून द्या. तयार बिस्किटमध्ये डिलिशियस ट्विस्ट अनुभवता येईल.

टाॅपिंग म्हणून वापर करा

ब्लुबेरीचा टाॅपिंगचे रुपातही सामील करु शकता. तुम्ही फ्लेवर्ड योगर्टपासून केक, पेस्ट्री, शेक आदीमध्ये ब्लुबेरी टाॅपिंग म्हणून वापर करु शकता.

loading image