Bottle Guard: दुधी भोपळ्याची साल असते पौष्टिक; सालीच्या दोन रेसिपी नक्की ट्राय करा

पांढरा-फुलांचा भोपळा, कॅलबॅश, न्यू गिनी बीन, तस्मानिया बीन आणि लांब खरबूज अशा वेगवेगळ्या नावांनी हा भोपळा ओळखला जातो.
Bottle Guard
Bottle GuardEsakal

हिरव्या भाज्यांचे फायदे सर्वांना माहीत आहेत आणि दुधी भोपळा ज्याला आपल्या भाषेत भोपळा म्हणतात, ही एक फळभाजी आहे ज्यामध्ये अनेक आरोग्य फायदे आहेत. पांढरा-फुलांचा भोपळा, कॅलबॅश, न्यू गिनी बीन, तस्मानिया बीन आणि लांब खरबूज अशा वेगवेगळ्या नावांनी हा भोपळा ओळखला जातो. ही भाजी केवळ शरीराला थंडावा देण्यापुरतीच मर्यादित नाही तर हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे आणि झोपेचे विकार कमी करण्यासही मदत करते.

आपण भोपळ्याची भाजी तर बऱ्याचदा खाल्ली असेल. मात्र भोपळ्याची भाजी करताना आपण त्याची साल काढून टाकतो. तज्ञांच्या मते भोपळ्याच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. आज आम्ही तुम्हाला भोपळ्याच्या सालीपासून बनवता येणाऱ्या दोन रेसिपीज सांगणार आहोत.

Bottle Guard: भोपळ्याच्या सालीची चटणी कशी तयार करावी?

भोपळ्याच्या सालीची चटणी सोपी आणि चवीला खूप स्वादिष्ट असते.

साहित्य:

1) एक कप भोपळ्याची साल

2) अर्धा कप कोथिंबीर

3) थोडी पुदिन्याची पानं

4) काळं मीठ

5) लिंबाचा रस

6) लसूण पेस्ट

कृती:

सर्वप्रथम भोपळ्याच्या सालीची चटणी बनवण्यासाठी एक कप भोपळ्याची साल, अर्धा कप कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं, काळं मीठ, आणि लसूण घ्या यावर लोम्बाचा रस पिला आणि हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घ्या. काही मिनीटांत तुमची भोपळ्याच्या सालीची चटणी तयार होते. ही चटणी तुम्ही भजी किंवा पराठ्यांसोबत सर्व्ह करू शकता.

Bottle Guard
Ashadhi Ekadashi 2022: उपवासाचा ढोकळा कसा करायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी

Bottle Guard: भोपळ्याच्या सालीपासून बनवा चवदार भाजी?

साहित्य:

1) दोन कप भोपळ्याची बारीक केली साल

2) जिर

3) एक टोमॅटो

4) एक कांदा

5) कोथिंबीर

6) मीठ

7) हळद

8) हिरव्या मिरच्या

9) दोन चमचे तेल

10) आलं लसणाची पेस्ट

कृती :

सर्वप्रथम भोपळ्याच्या सालीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढई किंवा पॅनमध्ये तेल घ्या. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे, कांदा आलं लसणाची पेस्ट टाकून ते चांगले परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, मीठ आणि टमाटे टाका. हे मिश्रण थोडे शिजू द्या आणि त्यानंतर त्यामध्ये भोपळ्याच्या साली टाका. यानंतर ही भाजी थोडा वेळ शिजू द्या आणि नंतर कोथिंबीर टाकून गार्निश करा. तुम्ही ही भाजी चपाती किंवा पराठ्यांसोबत खाऊ शकता.

Bottle Guard
Dudhi Bhopla Kheer : पावसाळ्यात पौष्टिक खायचं आहे? दुधी भोपळ्याची खीर ट्राय करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com