Ashadhi Ekadashi 2022: उपवासाचा ढोकळा कसा करायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी | Food Recipe | Upvasacha Dhokla Recipe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashadhi Ekadashi Fast | Upvasacha Dhokla Recipe

Ashadhi Ekadashi 2022: उपवासाचा ढोकळा कसा करायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी

आता आषाढी एकादशी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे या आषाढी एकादशीच्या दिवशी फराळाला नेमकं काय करावं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. त्यामुळे आम्ही तुमच्याकरता आषाढी एकादशी स्पेशल फराळ रेसिपी सिरीज घेऊन आलो आहोत. या रेसिपी सिरीज मध्ये आज आपण बघणार आहोत उपवासाचा ढोकळा नेमका कसा करायचा ? (Ashadhi Ekadashi Fast)

हेही वाचा: Ashadhi Ekadashi 2022: एकादशीच्या दिवशी फराळाला करा खमंग साबुदाणा डोसा

उपवासाचा ढोकळा करता लागणारे साहित्य (Upvasacha Dhokla Recipe)-

1) एक वाटी शिंगाड्याचे पीठ

2) पाव वाटी भगरीचे पीठ

3) अर्धा वाटी दही

4) एक दोन हिरव्या मिरचीची पेस्ट

5) दोन चमचे इनो

6) काळीमिरी पूड(आवडत असेल तर)

7) मीठ चवीनुसार

8) लाल तिखट गरजेनुसार,

9) थोडसं ओलं खोबरं,

10) तेल गरजेनुसार

हेही वाचा: तुमच्या घरातील लोक दुधी भोपळ्याची भाजी खात नाही, मग बनवा त्याचे धपाटे..

उपवासाचा ढोकळा कसा करावा? जाणून घ्या कृती-

  • एका भांड्यात शिंगाड्याचे पीठ, भगरीचे पीठ, मिरचीची पेस्ट, दही , काळीमिरी पूड ,मीठ हे सगळया गोष्टी एकत्र करुन १० मिनिटे बाजूला मुरायला ठेवून दया.

  • पुढच्या दहा मिनिटांनी त्यात एक टेबलस्पून तेल आणि इनो घालुन हे मिश्रण चांगले एकजिव करुन घ्या.

  • नंतर ढोकळ्याच्या टिनला (साच्याला) थोडेसे तेल लावून त्यात हे तयार मिश्रण घाला आणि त्यावर वरुन थोडेसे लाल तिखट चिमटीने टाका. आणि ढोकळयाचा टिन स्टीमरमध्ये ठेवून दया. हे ढोकळयाचे मिश्रण मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटे स्टीमर वाफवून घ्या.

  • अंदाजे पंधरा ते अठरा मिनिटांनी त्यात चाकुचे टोक बुडवून बघा. त्यावरुन कळत की ढोकळा निट शिजला की नाही.

  • ढोकळा निट शिजून तयार झाला की साचा स्टीमर मधून बाहेर काढून थोड्यावेळ थंड करून घ्या.

  • थंड झाल की ढोकळा साच्यातून बाहेर काढून त्याचे बारीक काप पाडून घ्या. त्यावर ओलं खोबरं आणि शेंगदाण्याच्या चटणी बरोबर उपवासाच्या ढोकळ्याचा आस्वाद घ्या.

Web Title: Do You Know How To Make Dhokla Which Can Eat During Fasting Ashadhi Ekadashi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..