esakal | बनवा दही ब्रेड उपमा, जिभेबरोबर पोटाचीही काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेड दही उपमा

बनवा दही ब्रेड उपमा, जिभेबरोबर पोटाचीही काळजी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : सध्या वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही करत असाल. काही वेळेस ती बनवण्यास कंटाळाही येत असेल. आज तुम्हाला आम्ही एका हटक्या रेसिपीविषयी सांगणार आहोत. ती म्हणजे दही ब्रेड उपमा. जे पोटासाठी चांगले असते. तर चला जाणून घेऊ या रेसिपीविषयी...

साहित्य

---

- ८ ब्रेड स्लाईस

- १ कप दही

- १ मोठा चमचा तेल

- १ कापलेला कांदा

- १ छोटा चमचा राई

- ७-८ कढीपत्ता

- एक छोटा चमचा बारीक केलेला आद्रक

- १ बारीक कापलेली हिरवी मिरची

- १/२ छोटा चमचा हळदी पावडर

- चवीनुसार मीठ

- २ मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे

- १/२ छोटा चमचा गरम मसाला पावडर

- एक मोठा चमचा धने पावडर

- १/२ छोटा चमचा साखर

- १ छोटा चमचा बेदाणे

कृती

---

- सर्वप्रथम ब्रेड ग्राईंड करुन घ्या.

- आता दही घ्या

- एका कढाईत तडक्यासाठी सर्व सामान तयार करा आणि भाजलेले शेंगदाण्यांबरोबर सर्व भाज्या भाजून घ्या.

- आता हळदी पावडर टाकून ३० सेकंद भाजा. थोडेसे साखर टाका.

- आता ब्रेड आणि दही टाका. येथे मीठ टाकू नका.

- आता ती भाजू द्या आणि बाकी मसाले आणि मीठ टाका.

- कोथिंबीर आणि बेदाण्याने गार्निश करा. स्वादिष्ट गोड-आंबट उपमा खाण्यासाठी तयार आहे.

loading image
go to top