esakal | ब्रेडचे गुलाबजाम; वाचा सोपी रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेडचे गुलाबजाम; वाचा सोपी रेसिपी

अगदी कमी कालावधीत तयार होणारी ही रेसिपी अनेकांच्या पसंतीला उतरते.

ब्रेडचे गुलाबजाम; वाचा सोपी रेसिपी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबजाम मिळतात. यात खव्याचे, मैद्याचे असे वेगवेगळे गुलाबजाम आपण सर्वांनी खाल्ले असतील. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पदार्थ आवडतो. काही गोड खायची चव आली की आपण गुलाबजामला पहिली पसंती देतो. आज आपण ब्रेडपासून तयार होणाऱ्या गुलाबजामची रेसिपी पाहणार आहोत. अगदी कमी कालावधीत तयार होणारी ही रेसिपी अनेकांच्या पसंतीला उतरते. त्यामुळे ही सहज सोपी आणि घरीच उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून तयार होणारी रेसिपी आज आपण पाहणार आहोत.

हेही वाचा: मखनी मॅगी बनवा, ही आहे रेसिपी

साहित्य -

  • ब्रेड - १

  • दुध - ४ कप

  • साखर - आवश्यकतेनुसार

  • पाणी - २ वाटी

  • तेल - आवश्यकतेनुसार

हेही वाचा: Navratra 2021 नवरात्रीत उपवास करताय? हे Healthy Fasting चे प्रकार ट्राय करा!

कृती -

सुरुवातीला ब्रेडच्या बाजूचे काठ काढून घ्या. यानंतर त्या ब्रेडचे तुकडे करुन त्यात दुध घालून ते मळून घ्या. मळत असताना यातील गाठी फोडून घ्या. हलकेच हे पीठाचे छोटे गोळे करुन घ्या. एका बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवा. यात ब्रेडचे गोळे तळून घ्या. करपूस रंग आल्यानंतर हे बाहेर काढा. हे गोळे तळत असताना गॅस मंद आचेवर ठेवा. दुसऱ्या बाजूला एका भांड्यात २ ते ३ वाटी पाणी घ्या. यात साखर टाका आणि याचा पाक तयार करुन घ्या. हा पाक तयार झाला की हे तळलेले गोळे यात सोडा. काही काळासाठी तु्म्ही हे मुरवत ठेऊ शकता. किंवा हे न मुरवता खाण्यासाठी तयार आहेत.

loading image
go to top