esakal | बाहेर खाण्याऐवजी घरी बनवून खा ब्रेड पकोडा, 'ही' आहे रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेड पकोडा

बाहेर खाण्याऐवजी घरी बनवून खा ब्रेड पकोडा, 'ही' आहे रेसिपी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - ब्रेड पकोडा एक भारतीय फ्राईड रेसिपीचा प्रकार आहे. सहज कुठेही मिळेल असा पकोडाचा प्रकार आहे. आम्ही तुम्हाला हाॅटेलमधील ब्रेड पकोडाची रेसिपी सांगणार आहोत. ते तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी नाष्ट्यात खाऊ शकता. तर चला रेसिपीविषयी जाणून घेऊ...

साहित्य

----

- दोन उकडलेले बटाटे

- १ चमचा जिरे

- १ चमचा धने

- १ छोटा चमचा अजवाईन

- आवश्यकतेनुसार कोथिंबीर

- ४ ब्रेड स्लाईस

- २ कप बेसण

कृती

----

- सर्वप्रथम एक पॅन घ्या. पॅन गॅसवर ठेवून गरम करा. त्यात धने, जिरे टाकून चांगल्या प्रकारे भाजून घ्या. ती मिक्सरमध्ये बारीक करुन पावडर बनवा.

- आता पॅनमध्ये तेल टाका. ते गरम करुन घ्या. त्यात बारीक केलेले आद्रक टाका. त्यानंतर बारीक केलेली हिरवी मिरची टाका आणि सर्वसामग्री चमच्याने चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या.

- आता लाल मिरची पावडर, अमचूर पावडर, जिरे आणि धन्यांचे तयार पावडर टाकून चांगल्या प्रकारे हलवून घ्या.

- आता त्यात चवीनुसार मीठ आणि बारीक केलेली कोथिंबीर टाकून एकत्र करुन घ्या. आता थंड होण्यासाठी ते ठेवून द्या.

- आता त्यात बेसण, अजवाईन, लाल मिरची पावडर टाका. पुन्हा त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून पातळ पीठ बनवा. ते ५ ते ७ मिनिटांपर्यंत ठेवून द्या.

- त्यानंतर ब्रेड स्लाईसमध्ये उकडलेले बटाटा टाकून ते पसरुन त्यावरुन दुसरा ब्रेड स्लाईस ठेवून दाबा. आता ब्रेड स्लाईस बेसण पीठात बुडवून कढईत सोडून तळून घ्यायचे.

- तुमचे स्वादिष्ट ब्रेड पकोडा तयार आहे. ते पुदिनाची चटणी किंवा तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर खाऊ शकता.

loading image
go to top