

Bread Pakora Bites Recipe:
Sakal
easy bread pakora recipe at home: वीकेंडला सकाळी थोडा उशिरा उठून चहासोबत काहीतरी गरमागरम आणि कुरकुरीत खायची इच्छा असेल तर ब्रेड पकोडा बाइट्स हा एक परफेक्ट पर्याय आहे. कमी वेळात, कमी साहित्य वापरून तयार होणारी ही रेसिपी चवीला जबरदस्त लागते. बाहेरच्या पकोड्यांपेक्षा घरच्या घरी बनवलेले ब्रेड पकोडा बाइट्स अधिक स्वच्छ आणि हेल्दीही असतात.
मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे छोटे बाइट्स आवडतात. चहा, कॉफी किंवा सॉसबरोबर हे पकोडा बाइट्स खाल्ल्यावर वीकेंडची सुरुवात आणखी खास होते. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला खुप सोपी आहे. चला तर मग या वीकेंडला ब्रेड पकोडा बाईट्स नक्की ट्राय करा.