Breakfast Recipe: पारंपरिक रेसिपी बोर झालीये? पोह्यांची 'ही' पद्धत ट्राय करा

Pohe
PoheSakal

रोजच्या नाश्त्याला आपल्या घरात काय असतं? प्रश्न अजिबातच कठीण नाही बहुदा घरातलं लहान मुलंही सांगेल की पोहे किंवा उपमा; कित्येक दिवस बहुदा वर्षानुवर्ष नाश्ता म्हटला की आपल्या घरात पोहे उपम्याचा दरवळ पसरतो.

(Breakfast Recipe: Try this New Corn Poha Receipe)

तशी त्यात कधी कधी चेंज म्हणून थालीपीठ, धिरडे, शिरा, सँडविच अशा गोष्टींची भर पडते; पण ती आठवड्यातून फार फार तर दोनदा.. आणि जर आदल्या दिवशीची पोळी किंवा भात उरला असेल तर त्यादिवशी पोळीचा कुस्करा किंवा भात, पण हे क्वचितच घडतं.

पण आता रोज तरी काय वेगळं करायचं? बर त्यात वेळही हवा या सगळ्यासाठी; रोज रोजच्या पोह्यांच्या रेसिपीने तुम्हीही वैतागला आहात? मग ट्राय करा कॉर्न पोहे.

साहित्य:

  • 100 ग्रॅम पोहे

  • 1 बारीक चिरलेला कांदा

  • 1/2 वाटी उकडलेले स्वीट कॉर्न

  • 2 पळी तेल

  • 1/2 चमचा हळद

  • 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या

  • 1 चमचा साखर

  • 1/2 चमचा मोहरी

  • कडीपत्ता 1 काडी

  • लिंबू

  • चवी नुसार मीठ

  • कोंथिबीर

  • ओल्या नारळाचा किस

कृती

स्टेप 1

एका रोळीत किंवा चाळणीत पोहे काढून स्वच्छ चाळून घ्या; त्यावर हळू हळू पाणी घालून ते ओले करून घ्या. पोहे जास्त ओले करू नका नाहीतर त्याचा लगदा होईल

स्टेप 2

कढई मध्ये 2 पळी तेल घाला; तेल ताप्यावर त्यात मोहरी घाला, मोहरी छान तडतडली की त्यात हिंग आणि शेंगदाणे घाला; शेंगदाणे शिजायला वेळ लागतो त्यामुळे ते आधी टाकावे.

स्टेप 3

आता त्यात क्रमाने मिरची, कडीपत्ता, हलक्या फ्लेवर साठी थोडीशी कोथिंबीर आणि कांदा घाला; कांदा लालसर झाला की त्यात उकडलेले कॉर्न घाला.

स्टेप 4

सगळ छान परतवून त्यात हळद घाला आणि मग पोहे; सगळं व्यवस्थित परतवून घ्या. आता त्यात चवीपुरता साखर आणि मीठ घालुन छान मिक्स करा; आणि अगदी दोन मिनिटं वाफ भरण्यासाठी झाकण ठेवा.

स्टेप 5

वाफ भरली, पोहे शिजले की गॅस बंद करा सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून त्यावर ओल्या नारळाचा किस, कोथिंबीर घाला, बाजूला लिंबाची फोड ठेवा आणि सर्व्ह करा.

गरमागरम कॉर्न पोहे तयार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com