
Step-by-step Gopalkala Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमी आली की सगळीकडे आनंदाचं आणि भक्तिभावाचं वातावरण असतं. या दिवशी मंदिरांमध्ये आणि घराघरात प्रेमाने बनवल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी ‘गोपाळकाला’ या पदार्थाला एक खास स्थान आहे. हा पदार्थ फक्त धार्मिकदृष्ट्याच महत्त्वाचा नाही, तर तो खूपच पौष्टिकही आहे.
श्रीकृष्णाला लोणी, दही, पोहे हे अतिशय आवडत होते, आणि गोपाळकाला म्हणजे या सगळ्याचं एक सुंदर, चविष्ट मिश्रण. दह्याची हलकी आंबट-गोड चव, नारळाचा गोडसर स्वाद, ताज्या काकडीचा कुरकुरीतपणा आणि वरून दिलेली खमंग फोडणी. हे सगळं मिळून त्याची चव अगदी अप्रतिम लागते. चला तर मग याची अगदी सोपी रेसिपी पाहूया...