Christmas Special Recipe: ख्रिसमस स्पेशल पीनट बटर ग्रॅनोला बार कसा तयार करायचा?

ख्रिश्चनांचा प्रभु मानल्या जाणार्‍या येशू ख्रिस्ताला प्रार्थना केली जाते आणि चर्च सजवल्या जातात आणि विविध समारंभांचे आयोजन देखील केले जाते.
 peanut butter granola bar
peanut butter granola bar Esakal

प्रत्येक वर्षी 25 डिसेंबरला येशू ख्रिस्ताच्या वाढदिवशी ख्रिसमस डे साजरा केला जातो. येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेम शहरात झाला. त्याच्या आईचे नाव मरीया आणि वडिलांचे नाव योसेफ होते. या दिवशी, ख्रिश्चनांचा प्रभु मानल्या जाणार्‍या येशू ख्रिस्ताला प्रार्थना केली जाते आणि चर्च सजवल्या जातात आणि विविध समारंभांचे आयोजन देखील केले जाते.घरातील लहान मुलांची ख्रिसमसला वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा असते. आजच्या लेखात आपण ख्रिसमस स्पेशल पीनट बटर ग्रॅनोला बार कसा तयार करायचा याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

 peanut butter granola bar
Christmas Tree Decorating Ideas: ख्रिसमस ट्री डेकोरेट करण्याच्या भन्नाट आयडिया

साहित्य:

एक कप ओट्स

दोन कप खजूर

एक कप बदाम 

दिड चिरलेले कप अक्रोडाचे तुकडे

दिड कप पीनट बटर किंवा बदाम बटर

फ्लेक्स बियाणे पावडर

 peanut butter granola bar
Christmas Special Recipe: ख्रिसमस स्पेशल घरच्या घरी बनवा एगलेस ड्रायफ्रूट केक

कृती:

पीनट बटर ग्रॅनोला बार रेसिपी तयार करण्यासाठी, प्रथम ओट्स एका पॅनमध्ये मध्यम आचेवर भाजून घ्या. ओट्स किंचित कुरकुरीत होईपर्यंत शिजवा, नंतर ते थोडे थंड होऊ द्या. आता बदाम, अक्रोड आणि अंबाडीच्या बियांची पावडर तयार करुन घ्या. पावडर थोडी खरखरीत राहू द्या.आता फूड प्रोसेसरमध्ये खजूर ठेवा आणि तो बारीक करून घ्या. आता बदाम पावडर, अक्रोड पावडर, फ्लेक्स सीड पावडर, पीनट बटर, ओट्स घालून चांगले एकजीव करा.आता हे मिश्रण एका चौकोनी ताटात ठेवा आणि वरून दाबा टाका जेणेकरून ते वरून एकसारखे होईल. आता रेफ्रिजरेटरमध्ये 3 ते 4 तास तसेच ठेवा.आता ते अर्धवट कापून एअर टाईट डब्यात ठेवा. तुम्ही तुमच्या संध्याकाळच्या कॉफीसोबत नो बेक पीनट बटर ग्रॅनोला बार खायला देऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com