चुलीवरचं आईस्क्रीम खाल्लंय का? कुठे मिळेल? जाणून घ्या|Chulivarche Icecream | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chulivarche Icecream
चुलीवरचं आईस्क्रीम खाल्लंय का? कुठे मिळेल? जाणून घ्या|Chulivarche Icecream

चुलीवरचं आईस्क्रीम खाल्लंय का? कुठे मिळेल? जाणून घ्या..

उन्हाळा असो वा हिवाळा आईस्क्रीम (Icecream) खाणं सर्वांनाच आवडतं. कुठल्याही सिझनला आईस्क्रीम आवर्जून खाल्लं जातं. लाकडाच्या चुलीवर बनवले जाणारी चुलीवरची मिसळ तुम्हाला माहिती असेलच. त्याचपद्धतीने चुलीवरचे आईस्क्रीम (Chulivarche Icecrea) ही खूप प्रसिद्ध आहे. याविषयी कदाचित तुम्ही आधी एेकले असेलच.

ही नवीन डिश आहे का? असे तुम्हाला वाटणे साहजिक आहे. पण २०१७ साली नाशिकच्या साधना रेस्टॉरंटने हे चुलीवरचे आईस्क्रीम लोकप्रिय केले. तोंडातून पाणी सुटेल असे हे आईस्क्रीम कसे तयार केले याविषयीही त्यांनी उल्लेख केला आहे. हे आईस्क्रीम आता शिर्डीतही मिळायला लागले आहे.

हेही वाचा: मटण आवडतं! मग, हा प्रकार खाण्याआधी फायदे-तोटे जाणून घ्या

Chulivarche Icecream

Chulivarche Icecream

त्यांच्या फेसबुक पोस्टवरून चुलीवरचे आईस्क्रीम तयार करताना लाकडाच्या चुलीवर शुद्ध अनस्क्रीम्ड केलेले दूध उकळले जाते. नंतर ते लाकडाच्या भांड्यात एकत्र केले जाते. त्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवून गार केले जाते. अशा या हाताने बनवलेल्या आईस्क्रीमची चव चांगलीच लागणार.

हे रेस्टॉरंट पारंपारिक मिसळ, चुलीवरची मिसळ खाण्यासाठी जेवढे लोकप्रिय आहे. तितकेज आजही चुलीवरचे आईस्क्रीम खाण्यासाठीही लोकप्रिय आहे. २०२२ मध्ये त्याची खूप चर्चा आहे. सध्या या आईस्क्रीमची चर्चा ट्विटरवर जोरदार सुरू आहे. अनेकांनी कमेंट्स करून हे आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा: काढा प्या, प्रतिकारशक्ती वाढवा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ice Cream
loading image
go to top