काढा प्या, प्रतिकारशक्ती वाढवा! |Immunity Boosting Kadha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KADHA
काढा प्या, प्रतिकारशक्ती वाढवा|Immunity Boosting Kadha

काढा प्या, प्रतिकारशक्ती वाढवा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे (Corona) सगळीकडे सावट आहे. रूग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे लोकं पुन्हा घाबरले आहेत. सामाजिक अंतर, मास्कचा वापर आणि योग्य स्वच्छता पाळणे या बेसिक गोष्टी जश्या आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी आवश्यक आहेत. पण त्याचबरोबरीने तुम्ही दिवसभरात जे खाता, पिता तेही तुम्हाला निरोगी ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते. पौष्टिक भाज्या, फळे, मसाल्याचे खाद्यपदार्थ आणि पेये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि संसर्गाची शक्यता कमी करण्यास मदत करतात. सध्या आपण ओमिक्रॉन आणि फ्लूच्या दुहेरी धोक्याचा सामना करत आहोत. तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढा पिणे अत्यंत गरजेचे आहे.

हेही वाचा: कोरोना काळात फुफ्फुसांची घ्या काळजी, 'हे' ५ पदार्थ खाणे टाळा

 Spice

Spice

साहित्य- एक इंच आलं, २ मोठे चमचे गुळ, ५-६ लवंगाचे तुकडे, १-२ बडी इलायची,३-४ दालचिनीचे तुकडे, २-३ काळी मिरी, एक चिमुट ओवा, चिमुटभर बडीशेप, १ टीस्पून चहा मसाला

कृती- एका खोलगट पातेल्यात २ ग्लास पाणी घेऊन ते गॅसवर उकळायला ठेवा. त्यात किससेले आले आणि इतर सगळे साहित्य घाला. पाण्याचा रंग गडद होईपर्यंत ते ७ ते १० मिनिटं उकळा. तयार झालेला काढा एका कपमध्ये गाळून घ्या आणि गरम प्यायल्या द्या. दोन लहान कप काढा तयार करण्यासाठी वर दिलेले साहित्य योग्य आहे. पण, जर तुम्हाला आणखी मोठ्या प्रमाणात काढा करायचा असेल तर साहित्य वाढावा.

हेही वाचा: पोपटी पार्टी घरी कशी कराल? 'या' टिप्स फॉलो करा|Popti Party At Home

काढा पिण्याचे फायदे (How This Drink Helps)

काळी मिरी, लवंगा, बडीशेप, वेलची अशा मसाल्यांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करत असल्याने सर्दी-खोकला, घसा खवखवत असेल तर तुम्हाला आराम मिळतो. अनेक अभ्यासांनी सिद्ध केले आहे की आहारात मसाल्यांचा समावेश केल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. शिवाय, आले हे औषधी आहे. त्यात तीव्र दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. आहारात आल्याचे प्रमाण वाढवल्याने तुमची रोगप्रतिकारक वाढते. तसेच गूळ घातल्याने तुमच्या कढ्याची चव वाढू शकते आणि तुमची श्वसन प्रणाली स्वच्छ होऊ शकते. शिवाय आपले शरीर डिटॉक्स राहून सर्दी आणि फ्लूशी लढते.

हेही वाचा: सायकल चालविल्याने कॅन्सरचा धोका कमी, वाचा इतरही फायदे Cycling Benefits

दिवसातून किती वेळा प्याल ? (How Much Kadha You Must Have)

काढा आरोग्यदायी असला तरी त्याचे सेवन मर्यादित असावे. दिवसभरात जास्त वेळा काढा प्यायल्याने पित्त, छातीत जळजळ आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. एका दिवसात दोन वेळा किंवा दोन कप काढा घेणे योग्य. तुम्ही चहा -कॉफी एेवजी सकाळी -संध्याकाळी काढा पिऊ शकता.

हेही वाचा: रितेश-जेनेलिया देशमुखचा डाएट प्लॅनिंग माहितीय का? तुम्हीही सहज करू शकता!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top