
स्मिता देवकर-वाळुंज
गेल्या दिवाळीच्या आधी पंधरा-वीस दिवसांपूर्वीची गोष्ट. बेसनाच्या लाडूचा बेत केला होता. लेकीला बेसन लाडू खूप आवडतात. आम्ही वाड्यात राहत असल्याने शेजारच्या काकूंकडून; तसेच तिच्या मावशीकडून हे लाडू नेहमीच पार्सल येत असतात. त्यामुळेच हे लाडू मी करत नाही आणि या लाडवाच्या बाबतीत माझा सुगरणपणा थोडा मार खातो.