esakal | ‘स्वयंपाकातून आनंद’ मिळतो ; बिपाशा बासू | Food
sakal

बोलून बातमी शोधा

food

‘स्वयंपाकातून आनंद’ मिळतो ; बिपाशा बासू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- ग्लॅम फूड

अभिनेत्री बिपाशा बासू स्वतः डाएटबाबत अतिशय जागरूक असली, तरी ती खवय्यीही तितकीच आहे. तिला खायला आणि खिलवायलाही आवडतं. पती करणसिंह ग्रोव्हर ‘‘मला तिच्या पाककलेच्या प्रयोगांसाठी गिनीपिग बनावं लागतं,’’ असं गमतीनं म्हणतो. बिपाशा तिच्या पाककलेच्या प्रयोगांचे फोटो इन्स्टाग्रामवरही टाकत असते. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त बिपाशानं बेसनाचे लाडू बनवले होते. लहानपणी तिनं मॅगी नूडल्स पहिल्यांदा केल्या होत्या. आता ती हक्का नूडल्सही स्वतः तयार करू शकते.

शूटिंगच्या ठिकाणी सॅलड्स, मोड आलेली कडधान्यं खाण्याला ती प्राधान्य देते. ताज्या फळांच्या फोडी, त्यात दही, थोडी, साखर, मीठ आणि चाट मसाला हे तिचं आवडतं सॅलड आहे. तिची दिवसाची सुरुवात लिंबू आणि मध घातलेल्या गरम पाण्यानं होते. रोज एक तरी ताजं फळ खाल्लंच पाहिजे हा तिचा कटाक्ष असतो. रात्रीचं जेवण अतिशय कमी असावं असं तिचं मत आहे. शक्यतो रोटी आणि दाल ती पसंत करते. मुंबईत आल्यावर तिच्या आहारविषयक सवयी खूप बदलल्या. आधी तिला भात आवडायचा; पण आता ती चपाती खाणं जास्त पसंत करते.

कोलकत्यातले सगळे पदार्थ तिला आवडतात. झाल मुरी, आलू काबली... आणि हो ‘यम्मी’ रसगुल्ले तिला आवडतात. तिची आई अतिशय उत्तम स्वयंपाक करायची. तिच्या हातची हैदराबादी बिर्याणी बिपाशा मिस करते. तिचे वडील उत्तम थाई डिशेस बनवतात. क्रीमी ब्रुली, गरम गुलाबजाम आणि गरम जिलेबी हे तिचे आवडते डेझर्ट्‌स आहेत. नारळाचं पाणी पित राहणं तिला आवडतं. पिच फ्लेवर्ड लेमन टी हेही तिचं आवडतं पेय आहे. थाई, दाक्षिणात्य, बंगाली आणि हैदराबादी डिशेस तिला आवडतात. हैदराबादमधल्या ग्रँड कॅकेशियामधलं बुफे खूप उत्तम असतं असं तिचं म्हणणं आहे. मुंबईतल्या मॅरिएट कॉफी शॉपमधल्या डिशेसही ती एंजॉय करते.

loading image
go to top