esakal | चायनीज पदार्थात मीठ जास्त पडलं? ६ पद्धतीने करा कमी
sakal

बोलून बातमी शोधा

cooking tips

चायनीज पदार्थात मीठ जास्त पडलं? ६ पद्धतीने करा कमी

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी मीठ महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतं. मात्र, मीठाचा वापर करतांना तो अगदी सांभाळून करावा लागतो. ज्याप्रमाणे मीठामुळे पदार्थाची चव वाढते. त्याचप्रमाणे मीठ जास्त झाल्यावर त्या पदार्थाची चव बिघडूदेखील शकते. त्यामुळे कोणताही पदार्थ करतांना मीठाचा अंदाज हा पक्का असायला हवा. मात्र, अनेकदा घाईमध्ये किंवा अंदाज न आल्यामुळे पदार्थामध्ये मीठ जास्त होतं. अशावेळी खरी पंचाईत होते. तयार केलेला पदार्थ टाकून देणं शक्य तर नसतं. मग, अशावेळी मीठाचा खारटपणा कमी करणं नक्कीच आपल्या हातात आहे. त्यामुळे पदार्थांमध्ये मीठ जास्त झाल्यावर त्याचा खारटपणा कसा कमी करावा ते पाहुयात.

१. तेलावर परतून केलेल्या किंवा केवळ वाफेवर शिजवलेल्या भाजीत मीठ जास्त झाल्यास त्यात थोडंसं बेसन पीठ भाजून घालावं.

२. पातळ भाजीत मीठ जास्त झालं तर त्यात कणकेचे लहान लहान गोळे करुन टाकावेत. व भाजीला उकळ आल्यानंतर कणकेचे गोळे काढून टाकावेत.

हेही वाचा : आहारवेद : जांभळाचं सरबत तयार करा फक्त 15 मिनिटात

३. नॉनव्हेज पदार्थामध्ये मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा घाला.

४. चायनीज पदार्थ करतांना मीठ जास्त झालं तर त्यात थोडा लिंबाचा रस टाकावा.

५. कोणत्याही भाजीत मीठ जास्त लागत असेल तर त्यात बटाटे मिक्स करावेत.

६. तसंच ब्रेडचे तुकडे बारीक करुन घातल्यासही मीठाचं प्रमाण नियंत्रण येतं.