Non-Stick पॅनमध्ये अन्नाचे 'हे' प्रकार शिजवताना घ्या काळजी

आजकाल प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात नॉन स्टीक भांड्यांचा वापर केला जातो
Non-Stick pan care
Non-Stick pan care

Things Not To Be Cooked In A Nonstick Pan : आजकाल प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात नॉन स्टीक भांड्यांचा वापर केला जातो. या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे सोपे असल्याचे लोकं समजतात. यात अन्न शिजवताना जळत तसेच चिकटत नाही. त्यामुळे अशा गोष्टी नॉन-स्टिक पॅनमध्ये अगदी सहज शिजवल्या जाऊ शकतात. नॉन-स्टिक पॅनच्या वरच्या पृष्ठभागावर एक विशेष कोटिंग केले जाते, ज्यामुळे अन्न शिजवताना चिकटत नाही. पण त्यामुळे प्रत्येक पदार्थ या पॅनमध्ये शिजवायची असे काही नाही. या पॅनमध्ये काही पदार्थ शिजवताना काळजी घेणे गरजेचे आहे.

Non-Stick pan care
Anxiety Relief Tips : फक्त एक ग्लास पाणी प्या! अस्वस्थता दूर ठेवा

व्हेजीटेबल स्टिअर फ्राय- व्हेजिटेबल स्टीअर फ्राय हा पदार्थ मोठ्या आचेवर तयार केला जातो. तसेच कॅरेमलाईजही केला जातो. पण मोठ्या आचेवर नॉन स्टीक पॅनची उष्णता कमी होते. तसंही नॉन स्टिक पॅनना जास्त उष्णता देऊ नये. त्यामुळे त्याच्या कोटिंगवर परिणाम होतो. तसेच विषारी घटक अन्नामध्ये मिसळतात.

non stick pan food
non stick pan food

जास्त वेळ शिजवायचे पदार्थ - नॉन-स्टिक पॅनमध्ये जास्त वेळ पदार्थ शिजवायचे असल्यास त्याचे कोटिंग तळण्यास सुरुवात होते. तसेच त्यातून निघणाऱ्या धुरामुळे अन्नावर परिणाम होतो. परिणामी आरोग्य बिघडू शकते.

Non-Stick pan care
फ्रिजमध्ये अन्न साठवताना या ५ चुका तुम्ही करता का?

मंद आचेवर स्वयंपाक करतानाही वापरू नका- तुम्ही सॉस, सूप, मांस, खीर किंवा कोणतीही डिश मंद आचेवर जास्त वेळ शिजवणार असाल तर काळजी घ्या. हे पदार्थ तळाशी चिकटू शकतात. त्यामुळे असे पदार्थ नॉन-स्टिक पॅनमध्ये शिजवू नयेत. यामुळे पॅनचे कोटिंग खराब खराब होतेच शिवाय ते आरोग्यासाठीही चांगले नसते.

Non-Stick pan care
दीर्घकाळ मसाले टिकविण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सोपे उपाय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com