

Creamy Paneer Beetroot Sandwich
Sakal
creamy paneer beetroot sandwich recipe: सकाळचा नाश्ता पौष्टिक, चवदार आणि पटकन होणारा असावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. रोजच्या पोह्यां-उपम्यांना कंटाळा आला असेल, तर क्रिमी पनीर बीट सँडवीच हा एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो. बीटमुळे मिळणारा नैसर्गिक गुलाबी रंग, पनीरची क्रिमी चव आणि मसाल्यांचा हलका तडका यामुळे हा सँडवीच दिसायलाही आकर्षक आणि खायलाही जबरदस्त लागतो. या सँडवीचमध्ये प्रोटीनयुक्त पनीर, आयर्नने भरलेले बीट, आणि फायबर असलेली ब्रेड यांचा उत्तम मेळ आहे. त्यामुळे हा नाश्ता केवळ पोट भरणारा नाही, तर दिवसभर ऊर्जा देणारा ठरतो. मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिसला जाताना पटकन खाण्यासाठी किंवा वीकेंडच्या ब्रेकफास्टला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर ही रेसिपी नक्कीच उपयोगी पडेल. चला तर मग जाणून घ्या लागणारे साहित्य आणिकृती काय आहे.