esakal | पावसाळ्यात कुरकुरीत कोबी भजी बनवा घरी; 'ही' आहे सोप्पी रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यात कुरकुरीत कोबी भजी बनवा घरी; 'ही' आहे सोप्पी रेसिपी

पावसाळ्यात कुरकुरीत कोबी भजी बनवा घरी; 'ही' आहे सोप्पी रेसिपी

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

पावसाळा सुरु झाला आहे. आणि तो सगळ्यांना हवाहवासा वाटतो. या ऋतूत सगळ्यांना चटपटीत आणि गरमागरम काही तरी खावेसे वाटते. अशा वेळेस प्रत्येकाला भजी बनवून खावे वाटते. भजीचे अनेक प्रकार आहेत. त्यातील एक म्हणजे कोबीची भजी. चला तर मग कोबी भजी कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

हेही वाचा: स्वादिष्ट कुरकरीत पालक भजी, बनवा घरच्या घरी

साहित्य:

- ३/४ कप बारीक चिरलेली कोबी

- १/४ कप बारीक चिरलेली भोपळी मिरची

- ४ टेस्पून बेसन

- १ टेस्पून कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लोअर

- २ हिरव्या मिरच्या

- ३ लसणीच्या पाकळ्या

- १ टिस्पून जिरे

- १/२ टिस्पून हिंग

- १ टिस्पून हळद

- १ टिस्पून लाल तिखट

- १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून

- चवीपुरते मिठ

- तळण्यासाठी तेल

हेही वाचा: ...तर तुमची भजी होईल बेचव!

कृती :

- प्रथम चिरलेली कोबी आणि भोपळी मिरची एका वाडग्यात एकत्र करा.

- त्याला थोडे मिठ चोळावे ज्यामुळे भाज्यांना थोडे पाणी सुटेल.

- मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या मिक्सरवर वाटून घ्याव्यात. किंवा मिरचीची आणि लसूणची पेस्ट उपलब्ध असेल तर ती वापरावी.

- मिठ लावलेल्या भाज्यांमध्ये वर दिलेले सर्व साहित्य घालून मिक्स करा.

- अगदी थोडे पाणी घालून कांदा भजीला भिजवतो तितपत घट्टसर भिजवा.

- तेल गरम करून भिजवलेल्या पिठाची लहान लहान बोंडं तळून घ्या.

- भजी तळताना मध्यम आचेवर तळावीत नाहीतर भजी आतमध्ये कच्ची राहण्याचा संभव असतो.

loading image