...तर तुमची भजी होईल बेचव!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

गुलटेकडी येथील मार्केट यार्डात शनिवारी इराण, इजिप्तच्या कांद्याची १३ टनांची आवक झाली. इजिप्तच्या कांद्याला  घाऊक बाजारात रविवारी दहा किलोला साडेतीनशे ते पावणेचारशे रुपये भाव मिळाला.

मार्केट यार्ड - तुमचा इरादा कांदाभजी बनवायचा असेल आणि त्यासाठी कांदे आणायला बाजारात निघाला असाल, तर ते पारखूनच घ्या!..कारण तुमच्या पिशवीत इजिप्तचाही कांदा पडू शकतो. त्यामुळे तुमची भजी बेचव होतील, यात तिळमात्र शंका नाही. 

...याचं कारण म्हणजे हा कांदा आपल्या कांद्यासारखा दिसत असला तरी त्याला म्हणावी तशी चव नाही. रंगरूप आणि आकाराने आपल्या कांद्यासारखाच असलेला हा कांदा इजिप्त आणि इराकमधून पुण्याच्या बाजारात दाखल झाला आहे. त्याचा भावही आपल्या कांद्याएवढाच आहे.   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुलटेकडी येथील मार्केट यार्डात शनिवारी इराण, इजिप्तच्या कांद्याची १३ टनांची आवक झाली. इजिप्तच्या कांद्याला  घाऊक बाजारात रविवारी दहा किलोला साडेतीनशे ते पावणेचारशे रुपये भाव मिळाला. इराणचा कांदा आकाराने मध्यम स्वरूपाचा आहे. त्याला मोड आले आहेत. भारतीय कांद्याला चव असली तरी इजिप्तच्या कांद्याला फारशी चव नसल्याने त्याला मागणी नाही. किरकोळ ग्राहकही या कांद्याकडे पाठ फिरवत आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यातुलनेत स्थानिक भागातील जुन्या कांद्यांना अधिक पसंती असून, त्याला दहा किलोसाठी तीनशे ते पाचशे रुपये भाव मिळत  आहे.  

 'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

पुण्यातील हॉटेलचालकांकडून इजिप्तच्या कांद्याला मागणी नाही. किरकोळ विक्रेत्यांकडूनही तुरळक स्वरूपात खरेदी होत आहे. दक्षिणेतील व्यापाऱ्यांनी या कांद्याची १ टनापर्यंत खरेदी केली आहे.
-राजशेखर पाटील, व्यापारी

अनावश्यक वादात चंद्रकांत पाटील यांना ओढणं चुकीचं!​

दहा किलोचे भाव
३५०-३७५ - इजिप्तचा
३००-५०० - स्थानिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Egyptian onion in Pune