एकाच पद्धतीने बनवलेली भेंडी खायचा कंटाळा आलाय? मग ट्राय करा ही कुरकुरीत भेंडीची रेसिपी

टीम ई सकाळ
Sunday, 14 February 2021

कुरकुरीत भेंडी ही चपाती, पराठे किंवा फक्त सॉससोबत खाता येईल. त्यामुळे ही कुरकुरीत भेंडी अनेकांची आवडती असते. तुम्ही पण या भेंडीची रेसिपी एकदा ट्राय करून बघा

नागपूर : भेंडीची भाजी अनेकांना आवडते. मात्र, नेहमी एकाच पद्धतीने केलेली भेंडी खायचा कंटाळा येतो. त्यासाठी भेंडीच्या नवनवीन रेसिपी करून स्वदीष्ट भेंडी बनवता येईल. त्यापैकीच एक वेगळी रेसिपी म्हणजे कुरकुरीत भेंडी. कुरकुरीत पदार्थ तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच आवडते असतात. त्यातही आवडती भेंडी कुरकुरीत बनवून खाल्ली तर ही पर्वणीच म्हणावी लागेल. 

हेही वाचा - खाल्ल्याबरोबर तोंडात विरघळणारी 'गोला रोटी' एकदा नक्की ट्राय करा, झटपट तयार करण्यासाठी...

कुरकुरीत भेंडी ही चपाती, पराठे किंवा फक्त सॉससोबत खाता येईल. त्यामुळे ही कुरकुरीत भेंडी अनेकांची आवडती असते. तुम्ही पण या भेंडीची रेसिपी एकदा ट्राय करून बघा. ही इतकी स्वादिष्ट असते की तुमच्या कुटुंबातील व्यक्ती पुन्हा-पुन्हा सर्व्ह करायला सांगतील. चला, तर मग पाहुयात कुरकुरी भेंडीची रेसिपी -

साहित्य -

  • भेंडी - २५० ग्राम
  • बेसन - अर्धा कप
  • काजूचे तुकडे - ३ चमचे
  • जीरा - १ चमचा
  • तेल - गरजेनुसार 
  • मीठ - चवीनुसार
  • आमचूर पावडर - अर्धा चमचा
  • तिखट - १ चमचा
  • बारीक कापलेला कांदा - अर्धा कप

हेही वाचा - तळलेले पदार्थ खायला आवडत नाही? तर ट्राय करा ‘बेक्ड स्नॅक्स’; तुम्हीही पडाल प्रेमात

कृती -
सुरुवातीला भेंडाला चांगले धुवून त्याचे टोक कापून घ्या. त्यानंतर भेंडी लांब आणि पातळ कापा. कापलेल्या भेंडीवर काजू, जीरा, आमचूर पावडर, लाल मिरची पावडर, कांदा आणि बेसन टाका. पाच मिनिटांसाठी झाकून ठएवा. त्यानंतर या मिश्रणातून पाणी सुटायला लागेल त्यावेळी पूर्ण मिश्रण मिळवून घ्या. एका भांड्यात तेल गरम करून हे मिश्रण थोडे-थोडे तेलात टाका. मध्यम फ्लेमवर त्याला सोनेरी रंग येतपर्यंत तळून घ्या. त्यानंतर तुमची कुरकुरीत भेंडी तयार असेल. ती सॉस, चपातीसोबत सर्व्ह करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crispy ladies finger recipe nagpur news