इशाऱ्यांवर चालणारं हॉटेल! संभाजीराजेंनी कौतुक करत सांगितली खासियत

संभाजीराजे छत्रपती यांनी इथं काम करणाऱ्या मुलांचं कौतुक केलंय.
hotel ishara
hotel ishara

मुंबईतील 'इशारा' हॉटेल तुम्हाला माहितीए का? या हॉटेलबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी खास पोस्ट लिहिली असून इथं काम करणाऱ्या मुलांचं कौतुक केलं आहे. या मुलांचं कौतुक करण्याचं कारणही तसंच आहे. कारण इथं काम करणारी मुलं ही केवळ इशाऱ्यानेच काम करतात, कारण ती मुकबधीर आहेत. (deaf dumb children Ishara hotel Sambhaji Chhatrapati write a special post)

संभाजीराजे म्हणतात, मुंबईमध्ये 'हॉटेल इशारा' या नावाचं छान रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथे काम करीत असलेल्या कोणालाच बोलता येत नाही आणि ऐकताही येत नाही. इथं सर्व चालतं ते इशाऱ्यावर किंवा कागदावर! म्हणूनच या हॉटेलचं नाव Ishaara आहे.

hotel ishara
Relianceची आता HUL, नेस्ले, ब्रिटानियासोबत स्पर्धा! 'या' नव्या बिझनेसची घोषणा

मूक व कर्णबधीर असलेली विशेष मुलं इथं काम करतात. मात्र, याचा परिणाम कोणत्याही बाबतीत जाणवत नाही. अत्यंत टापटीपपणा, स्वच्छता आणि येणाऱ्या ग्राहकाप्रती अतिशय विनम्रता या मुलांच्या वागण्यातून आपल्याला दिसून येते. निसर्गाने आपल्यात जी उणीव ठेवली, त्या उणीवेवर जिद्दीने मात करता येते, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हे ठिकाण!

hotel ishara
परवानगी मिळो अथवा नाही दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार - उद्धव ठाकरे

या आगळ्यावेगळ्या रेस्टॉरंटला भेट देऊन केवळ इथल्या जेवणाचा आस्वादच नव्हे तर या जिद्दी मुलांच्या प्रेमाची अनुभूतीही घेता आली. ज्यांच्या संकल्पनेतून हे हॉटेल सुरू झालं, त्यांच्या संवेदनशीलतेचं खरंच कौतुक आहे, अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com