
Make Diwali Meals Nutritious
sakal
दोन दिवसांत दिवाळी सुरु होईल, दिवाळी म्हणजे नुसता प्रकाशाचा सण नाही. जो फक्त दिवे, फटाके आणि सजावटीपुरताच मर्यादित नसून, विविध स्वादिष्ट पदार्थांसह प्रेम आणि आनंद वाटण्याचा सण आहे. मिठाई, तळलेले पदार्थ आणि स्वादिष्ट जेवण हे या सणाचा महत्त्वाचा भाग आहेत. या उत्साहात जास्त खाल्ल्यामुळे आम्लता, अपचन आणि वजन वाढणे यासारख्या समस्या भेडसावतात. यामुळे या दिवाळीच्या काळात, आपण स्वाद आणि आनंद कायम ठेवत ‘ताट रांगोळीप्रमाणे रंगीबेरंगी आणि पोषक पद्धतीने तयार करून आरोग्यदायी पद्धतीने दिवाळी साजरी करता येते, असे निरीक्षण आहार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.