Recipe : एकसारखे पनीर खाऊन कंटाळलात?, ढाबा स्टाईलची 'ही' सोपी डिश ट्राय करा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Recipe : एकसारखे पनीर खाऊन कंटाळलात?, ढाबा स्टाईलची 'ही' सोपी डिश ट्राय करा..

Recipe : एकसारखे पनीर खाऊन कंटाळलात?, ढाबा स्टाईलची 'ही' सोपी डिश ट्राय करा..

तुम्ही रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी काहीतरी चविष्ट आणि झटपट बनवण्याचा विचार करत असाल तर पनीर हा उत्तम पर्याय आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारात आपण पनीरचे काही पदार्थ बनवू शकतो. आज आम्ही तुम्हाला जी रेसिपी सांगणार आहोत ती बनवण्यासाठी अगदी सोपी आहे. रात्रीच्या जेवणात तुम्ही ढाबा स्टाइल पनीर प्याझा ही रेसिपी तयार करु शकता. रोटी किंवा पराठ्यासोबत तुम्ही ही भाजी सर्व्ह करु शकता.

पनीरची ही हटके रेसिपी कशी बनवावी हे तुम्हाला सांगत आहोत. तुम्ही घरी आलेल्या पाहूण्यांना खूश करण्यासाठीही ही रेसिपी तयार करु शकता. किती लोक जेवायला येणार आहेत किंवा किती संख्या आहे, यानुसार तुम्ही रेसिपीची सामग्री वाढवू किंवा कमी करू शकता. येथे सांगितलेले साहित्यातून तुम्ही दोन लोकांसाठी ही रेसिपी बनवू शकता.

हेही वाचा: Food : खिरीचे ‘हे’ हटके प्रकार नक्की ट्राय करा !

साहित्य -

पनीर - 200 ग्रॅम, 2 कांदे, हिरव्या मिरच्या, लसूण, लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, गरम मसाला, लोणी, जिरे, हिंग, आले, मॅगी मसाला (ऐच्छिक), वेलची 2 नग

कृती -

सुरुवातीला कांद्याचे गोल आणि लांब तुकडे करून घ्या. या रेसिपीसाठी लहान आकारातील कांदा कापण्याची गरज नाही. हे सॅलडसारखे गोल आकारातही चिरून घेता येईल. यानंतर आले-लसूण पेस्ट तयार करुन घ्या. आता पनीरचे चौकोनी तुकडे लहान लहान तुकडे चिरून घ्या. आता गॅसवर फ्राईंग पॅन ठेवा. त्यात लोणी, तूप किंवा मोहरीचे तेल टाकून हिंग, जिरे टाका. त्यानंतर कांदा टाकून ते भाजून घेऊन त्यात मीठ टाका.

हेही वाचा: Germany : जर्मनीत घराची किल्ली हरवल्यास पडतो ९० हजार रुपयांचा भुर्दंड

यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. कांद्याचा रंग बदलायला लागल्यावर म्हणजेच खरपूस तांबडा होत आला की त्यात आले, लसूण पेस्ट टाका. पेस्ट तळून झाल्यावर त्यात हिरवी मिरची टाकून त्यात थोडी हळद, मीठ, लाल मिरची आणि कसुरी मेथी टाका. सर्व मसाले चांगले परतून घ्या. या मसाल्यात पाण्याऐवजी थोडे दूध घालून ढवळून घ्या. यानंतर त्यात गरम मसाला आणि थोडे तूप टाकून पनीरचे तुकडे टाका. आता चीज घालून थोडावेळ ढवळा. शेवटी मॅगी मसाला आणि हिरवी वेलची घाला. तुमचा पनीर प्याझा तयार आहे.

Web Title: Dhaba Style Paneer Pyaza Recipe How To Cook Easy At Home

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..