
Diwali Faral history : उत्तर प्रदेशातील गुजीयाला फराळात मानाचे स्थान; पहा करंजीचा प्रवास!
उत्तर प्रदेशातील मसालेदार पदार्थ आपण कधीतरी बदल म्हणून नक्की ट्राय करतो. तिकडचे कुरकूरीत आणि भरपूर मसालेदार पदार्थ प्रसिद्ध आहेत. उत्तर प्रदेशाची स्वतःची वेगळी नवाबी खाद्यशैली आहे. यात बिर्याणी, कबाब, कोरमा, नहारी कुल्चे, शीरमल, जर्दा, रुमाली रोटी आणि वर्की पराठा रोटी अशा अनेक चमचमीत पदार्थांचा समावेश आहे. हे पदार्थ जसे आपल्या राज्यात आले तसे फराळात मानाचे स्थान मिळालेली करंजीही उत्तर प्रदेशातूनच लांबचा पल्ला गाठत महाराष्ट्रात आलीय. असं म्हणतात की, करंजी प्राचीन काळात शष्कुली या नावाने परिचित होती.
उत्तर प्रदेशात करंजीचे खरे नाव गुजिया आहे. गुजीया हा मैदा आणि खव्यापासून बनवलेल्या गोड पदार्थाचा एक प्रकार आहे. याला छत्तीसगडमध्ये कुसली, बिहारमध्ये पेडकिया, आंध्र प्रदेशात कज्जिकयालू म्हणून ओळखले जाते. उत्तर भारतात होळी आणि दक्षिण भारतात दीपावलीच्या निमित्ताने गुजीया बनवण्याची परंपरा आहे.
हेही वाचा: Diwali Recipe: बिना पाकाचे बेसन लाडु कसे तयार करायचे ?
गुजीयावरून जशी करंजी बनते. तसे, तसे बिहारची पारंपारिक डिश चंद्रकला बनवली जाते. याचा आकार गोल असून आतमध्ये ड्रायफ्रूट्सचे आणि खोबऱ्याचे गोड सारण भरून कडेला मुरड घातली जाते. आपल्याकडे खोबरं, रवा, साखर, वेलची घालून सारण तयार केले जाते. मैद्याची पोळी लाटून त्यावर सारण भरून मध्ये दुमडून पाण्याचा हात घेऊन ती पोळी अर्धचंद्राकार बनवली जाते. नंतर त्याला नक्षीदार चमच्याने कापून तळले जाते. तेव्हा कुठे कुरकूरीत करंजी तयार होते.