Diwali Recipe: दिवाळी स्पेशल इंस्टन मैदा चकली कशी तयार करावी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Instant Maida Chakli

Diwali Recipe: दिवाळी स्पेशल इंस्टन मैदा चकली कशी तयार करावी?

कमी साहित्यात इंस्टन मैदा चकली ही तयार होते. ही चकली खायला देखील चवदार आणि कुरकुरीत तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही चकली करायला अगदी सोपी आहे.

आपण दिवाळी स्पेशल खास  पदार्थाच्या काही वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत त्यातील पाचवी रेसिपी आहे, दिवाळी स्पेशल इंस्टन मैदा चकली कशी तयार करावी?

हेही वाचा: Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने चंपाकळी कशी तयार करायची?

साहित्य

1) अर्धा किलो मैदा

2) एक वाटी मुग दाळ

3) एक चमचा लाल तिखट

4) तीळ

5) ओवा

6) चवीपुरते मीठ

7) तळण्याकरता तेल

8) धना पावडर

हेही वाचा: Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक तांदळाच्या पिठाच्या ढेबऱ्या कशा तयार करायच्या?

कृती:

अर्धा किलो मैद्याची पुरचुंडी बांधून ती कुकर मध्ये ठेवावी. आणि मैदा कुकरमध्ये ठेवून त्याच्या तीन शिट्या काढुन घ्याव्यात.

कुकरची वाफ गेल्यावर मैद्याची पुरचुंडी सोडा व त्यातील गाठी हाताने फोडा अथवा मिक्सर वर हलक्या हाताने फिरवून घ्यावे.

नंतर मुगाची दाळ कुकरमध्ये गाळ शिजवून घ्यावी.मैदा थोडा थंड झाल्यावर त्यात, तिखट, मीठ,ओवा, तीळ टाकावे.

नंतर त्यात थोडी थोडी घोटलेली डाळ टाकत, पिठ नेहमीच्या चकलीच्या पिठाप्रमाणे मळा.(पाणी कमी वाटल्यास वरून थोडे साधे पाणी वापरू शकता)चकलीच्या सोऱ्याला, आतील बाजूस तेलाने ग्रीसिंग करा.

मळलेल्या पिठाचे उभे रोल करून,ते सोर्यात टाकवे व चकल्या करा. एकाच वेळी एका पेपर वर सगळ्या चकल्या करून घ्या.गॅसवर कढईत तेल तापत ठेवा. गॅसची फ्लेम मीडियम असू द्या.

सगळ्या चकल्या छान सोनेरी रंगावर तळून घ्या.खमंग, कुरकुरीत चकल्या तयार झाल्या.

सौजन्य- पुजा अमोल भोपळे