Diwali Recipe: नाशिकचा खमंग चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik's Khamang Chivda

Diwali Recipe: नाशिकचा खमंग चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा?

चविष्ट आणि खुसखुशीत, दिवाळी फराळातला लोकप्रिय पदार्थ म्हणजे चिवडा दिवाळीत अगदी प्रत्येकांच्या घरात वेगवेगळ्या पध्दतीने चिवडा हा तयार केला जातो.

आपण दिवाळी स्पेशल खास  पदार्थाच्या काही वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत त्यातील सहावी रेसिपी आहे, दिवाळी स्पेशल नाशिकचा खमंग चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा? 

हेही वाचा: Diwali Recipe: घरच्या घरी शेव कसे तयार करायचे?

साहित्य:

अर्धा किलो भाजके पोहे

तेल

साखर

सुक्या खोबऱ्याचे काप एक वाटी

दीड वाटी शेंगदाणे

दीड वाटी डाळ्या

चार ते पाच कांदे

तिखट

कढीपत्ता

मनुका (आवडीनुसार)

मीठ

तीन-चार आमसुले

लवंग, दालाचिनी, जिरे, शहाजिरे, धने, तमालपत्र, दगडफूल, मिरे, बडीशेप, तीळ हिंग हे सर्व मसाल्याचे पदार्थ प्रत्येकी १० ग्रॅम

हेही वाचा: Instant Chakli Recipe : दिवाळीसाठी सोप्या पद्धतीने कुरकुरीत चकली कशी बनवायची ?

कृती

सर्वप्रथम कांदा उभा चिरून तो मस्त कोरडा करून घ्यावा.

मसाल्याचे साहित्य प्रत्येकी समप्रमाण घेऊन, ते सर्व जिन्नस तेलावर वेगवेगळे भाजून एकत्र बारीक करावेत आणि त्याचा मसाला तयार करून घ्यावा.नंतर खोबऱ्याचे बारीक काप करून घ्यावेत.

पोहे स्वच्छ निवडून घ्यावेत. तेल घेऊन त्या तेलात कांद्याचे काप, खोबऱ्याचे काप, आमसुले व शेंगदाणे वेगवेगळे तळून घ्यावेत.

नंतर तेल खाली उतरवून, त्या तेलात चवीप्रमाणे मीठ व तिखट, हळद, तळलेली आमसुले बारीक चुरून घालावीत.

तयार केलेला मसाला, दाणे, खोबऱ्याचे काप, कांद्याचे काप व डाळे हे सर्व घालून चांगले कालवावे.

पोहे आणि चवीनुसार साखर घालून परत चांगले एकत्र करून घ्यावे अशा रितीने आपला चिवडा तयार झालेला आहे. हा चिवडा हवाबंद डब्बात ठेवावा.जेणेकरून तो वातड होणार नाही.