Diwali Recipes 2022 धनत्रयोदशी निमित्त नैवेद्य म्हणून बनवा सगळ्यांना आवडणारी आणि करायलाही सोप्पी अशी काजूकतली. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Recipes

दररोज देवाला नवीन काहीतरी नैवेद्य काय करावं या विचारात तुम्ही असाल

Diwali Recipes 2022: धनत्रयोदशी निमित्त नैवेद्य म्हणून बनवा सगळ्यांना आवडणारी आणि करायलाही सोप्पी अशी काजूकतली.

दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे; आता घरोघरी नवनवीन फराळाचे पदार्थ बनवले गेले असतील. दररोज देवाला नवीन काहीतरी नैवेद्य काय करावं या विचारात तुम्ही असाल. धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही देवाला काजू कतलीचा नैवेद्य दाखवू शकतात.

धनत्रयोदशीला धणे आणि बत्तासे ठेवून भगवान धन्वंतरींची आणि दक्षिण दिशेला दिवा लावून यमराजांची पूजा केली जाते. अशा वेळी नैवेद्य म्हणून तुम्ही तुमच्या हाताने बनवून देवाला काजू कतलीचा नैवेद्य दाखवू शकतात.

काजू कतली ही एक पारंपरिक आणि घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातल्या प्रत्येकाला आवडते आणि आपल्या आरोग्यासाठीही चांगली जाते.

हेही वाचा: Diwali 2022 : फराळात महिलांच्या मदतीला धावून येणारा फराळवाला : Diwali Recipes : Maharashtra Faralwala

काजू कतली बनवण्यासाठी साहित्य

काजू - २ वाटी

साखर - १ वाटी (चवीनुसार)

गाईच तूप - ४ चमचे

वेलची पावडर - १/२ चमचे

हेही वाचा: Diwali Recipe: घरच्या घरी कुरकुरीत खमंग मसाला शेव कसे तयार करायचे?

काजू कतली कशी बनवायची

आधी काजूचे काप करून घ्या आणि सर्व काजू मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्या. यानंतर, काजू पावडर चाळणीत टाकून चाळून घ्या. जेणेकरून काजूचे जाड तुकडे यात राहणार नाही. हे जाड तुकडे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून चाळून त्या पावडर मध्ये मिक्स करा.

एका पातेल्यात साखर आणि अर्धी वाटी पाणी घालून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. काही वेळाने साखर पाण्यात चांगली मिसळली की त्यात काजू पावडर घालून मिक्स करा आणि गॅस बारीक करा.

हेही वाचा: Diwali Recipe: खारे शंकरपाळे कसे तयार करायचे?

हे काजूचे मिश्रण गोठण्याइतपत घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यात मिश्रणात वेलची पावडर आणि तूप घालून मिक्स करा. नंतर गॅस बंद करा. .

आता एक प्लेट किंवा ट्रे घ्या आणि त्याच्या तळाशी तूप चांगले लावा. आणि तयार केलेली पेस्ट प्लेटमध्ये ठेवा आणि ती फिरवत राहा जेणेकरून पेस्ट लवकर थंड होईल.

हेही वाचा: Diwali Recipe: घरच्या घरी गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा कसा तयार करायचा?

पेस्ट थोडी गरम राहिली की बटर पेपरवर थोडं तूप लावून घ्या. या सारणाचे हाताने मोठे मोठे गोळे करून बटर पेपर वर पसरवून घ्या तुम्ही यासाठी लाटण्याचीही मदत घेऊन शकतात. त्यानंतर सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. काजू कटलीचे मिश्रण सेट झाल्यानंतर चाकूच्या मदतीने हिऱ्याच्या आकारात कापून घ्या. आता तुमची स्वादिष्ट काजू कतली तयार आहे.