Worlds Most Expensive Ice Cream: जगातील सर्वात महागडं आईसक्रिम, किंमत ऐकून फुटेल घाम

आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या आईस्क्रीमबद्दल सांगणार आहोत. या आइस्क्रीमची किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
ice-cream
ice-creamsakal

आइस्क्रीम ही एक आवडती डिश आहे जी उन्हाळ्यात सर्व वयोगटातील लोक खातात. हे वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये येते आणि प्रत्येकाचे स्वतःचे आवडते आइस्क्रीम असते. लोक अनेकदा त्यांचे आवडते आईस्क्रीम खाण्याची मागणी करतात. काही लोकांचे आवडते ब्रँड आणि चव असतात, जे ते अनेकदा खातात.

काहींना मँगो तर काहींना व्हॅनिला आईस्क्रीम आवडते, पण आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या आईस्क्रीमबद्दल सांगणार आहोत. जपानमध्ये जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम तयार करण्यात आले आहे, ज्यासाठी लोक एक-दोन नव्हे तर सहा स्कूटी खरेदी करू शकतात.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नुसार, एका जपानी कंपनीने जगातील सर्वात महाग आईस्क्रीम बनवले आहे, जपान नुसार ज्याची किंमत 8,73,400 म्हणजे भारतात त्याची किमत सुमारे 5.2 लाख रुपये आहे. सेलॅटो नावाच्या ब्रँडने हा खास गोड पदार्थ तयार केला आहे. यामध्ये त्यांनी अनेक दुर्मिळ आणि महागड्या साहित्याचा वापर केला आहे.

आईस्क्रीमच्या एवढ्या महागड्या किमतीचे कारण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. इटलीच्या, अल्बामध्ये सापडलेला पांढरा ट्रफल या आइस्क्रीममध्ये घातला गेला आहे, जपान नुसार ज्याची किंमत प्रति किलोग्राम 2 दशलक्ष आहे. आणि भारतात त्याची किमत सुमारे 12 लाख रुपये आहे. यासोबतच परमिगियानो रेगियानो आणि सेक ली यांचाही आइस्क्रीमचे घटक म्हणून वापर केला जातो. त्यामुळे या आइस्क्रीमची किंमत गगनाला भिडली आहे.

ice-cream
Dryfruits : खीर असो वा शीरा; प्रत्येक गोड पदार्थात असणारा मनुका घरच्या घरी कसा बनवाल?

सेलाटो ब्रँडचे उद्दिष्ट युरोपियन आणि जपानी घटकांना एकत्रित करून एक अनोखे आइस्क्रीम तयार करण्याचे होते आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी ओसाका येथील लोकप्रिय फ्यूजन रेस्टॉरंट रिवीचे मुख्य शेफ तादायोशी यामादा यांची मदत घेतली.

वेबसाइटनुसार,टेस्ट सेशनमध्ये भाग घेतलेल्या सेलाटो कर्मचाऱ्याने सांगितले की, पांढऱ्या ट्रफलच्या उत्कृष्ट सुगंधामुळे तुम्हाला ते खाण्याची इच्छा होईल. जपानी ब्रँडच्या प्रवक्त्याने GWR ला स्पष्ट केले, "आम्हाला चव परिपूर्ण करण्यासाठी 1.5 वर्षांहून अधिक काळ लागला. ते योग्य बनवण्यासाठी आम्हाला खूप चाचण्या घ्याव्या लागल्या."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com