esakal | शिल्लक राहिलेल्या राजमाला फेकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट पदार्थ

बोलून बातमी शोधा

शिल्लक राहिलेल्या राजमाला फेकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट पदार्थ

शिल्लक राहिलेल्या राजमाला फेकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट पदार्थ

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : अनेक वेळा आपण शिल्लक राहिलेले राजमा फेकून देतो. परंतु हा लेख वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच त्यापासून स्वादिष्ट पदार्थ तयार कराल.राजमा चावल नाव ऐकताच आपल्या तोंडाला पाणी सुटते. घरातील सर्वच सदस्यांना हा पदार्थ आवडतो. त्यामुळे घरात हा पदार्थ तयार झाला की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण या खाद्यपदार्थावर तुटून पडतात. परंतु अनेक वेळा राजमा शिल्लक राहतो. त्यावेळी त्याचे काय करायचे असा प्रश्न पडतो. त्यामुळे ते आपण फेकून देतो.आता यापुढे तुम्हाला ते फेकण्याची जरुरी नाही. कारण आपण त्यापासूनच अत्यंत स्वादिष्ट अशी रेसिपीज् बनवू शकतो. आपण या ठिकाणी जाणून घेऊया राजमा पासून काय काय तयार करू शकतो.

कटलेट तयार करा

आवश्यक साहित्य :

राजमा दोन कप

आले-लसूण पेस्ट एक चमचा

बटाटे दोन उकडलेले

चाट मसाला अर्धा चमचा

धने पूड दोन चमचे

मिरची पावडर एक चमचा

मीठ आवश्यकतेनुसार

गरम मसाला अर्धा चमचे

तयार करण्याची पद्धत

कटलेट तयार करण्यासाठी सर्वात प्रथम शिल्लक राहिलेला राजमा मिक्सरमध्ये घालून ते चांगल्या पद्धतीने बारीक करून घ्या. त्याला प्लेटमध्ये काढून ठेवा. राजमाच्या पेस्टमध्ये उकडलेले बटाटे, धने पूड, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर टाकून चांगल्या पद्धतीने मिक्स करा. त्यानंतर हाताला तेल लावून घ्या. मिश्रणाला कटलेटच्या आकारांमध्ये तयार करा. कढईमध्ये तेल घेऊन ते गरम झाले की त्यामध्ये कटलेट सोडा. दोन्ही साईड चांगल्या पद्धतीने तळून घ्या. अशा पद्धतीने अन्य कटलेट च्या प्रमाणेच आपण आपल्याला आवडेल त्या चटणीबरोबर अथवा स्वास बरोबर हे कटलेट खाऊ शकतो.

शिल्लक राहिलेल्या राजमा पासून पराठा

सर्वात प्रथम आटा चांगल्या पद्धतीने भिजवून घ्या. आणि ते काही वेळासाठी झाकून ठेवा. शिल्लक राहिलेले राजमा, हिरवी मिरची, मीठ हे एकत्र करून ते चांगल्या पद्धतीने मळून घ्या. त्यानंतर पीठ गोलाकार थापटून घेऊन त्यामध्ये राजमा चे मिश्रण भरा आणि ते थापटून घ्या. आता एका तव्यामध्ये बटर घालून गरम करा आणि त्यामध्ये पराठा दोन्ही बाजूने चांगल्या पद्धतीने भाजून घ्या. अशा पद्धतीने शिल्लक राहिलेल्या राजमा पासून आपण पराटा करू शकतो.

राजमा पासून बनवा सॅंडविच

साहित्य

राजमा एक कप

चार ब्रेड

एक कांदा

टोमॅटो एक

मीठ आवश्यकतेनुसार

दोन हिरव्या मिरच्या

चीज दोन चमचा

बटर दोन चमचा

तयार करण्याची पद्धत

सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये राजमा घ्या. त्यामध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो असे सर्व साहित्य टाकून ते त्याचे मिश्रण तयार करा. तवा गरम करून हे सर्व मिश्रण हलकेसे भाजून घ्या आणि ते प्लेट मध्ये काढा. त्यानंतर ब्रेडला बटर लावा आणि त्याच्यामध्ये ब्रेड दोन्ही बाजूने भाजून घ्या. आता एका ब्रेडवर तयार झालेले मिश्रण घाला आणि ते चांगल्या पद्धतीने पसरून घ्या. त्यावर दुसरा ब्रेड घाला अशाच पद्धतीने अन्य ब्रेड वर मिश्रण घालून राजमा सॅंडविच तयार करू शकता.