

Dry Fruits Karanji Recipe: Make Crispy Diwali Sweets at Home
esakal
Diwali Special Dry Fruits Karanji Recipe: दिवाळी म्हंटल की घरोघरी पारंपरिक फराळाची रेलचेल सुरू होते. चकली, चिवडा, लाडू यांसोबतच फराळाच्या ताटाची खरी शोभा वाढवते ती म्हणजे कुरकुरीत आणि गोड करंजी! यंदा दिवाळीच्या निमित्ताने घरी देवाच्या नैवेद्यासाठी आणि पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी काहीतरी नवीन आणि शाही बनवायचे असेल, तर 'ड्रायफ्रुट्स करंजी' (Dry Fruits Karanji / Karchikai) हा एक उत्तम पर्याय आहे.
गव्हाचा रवा आणि मैदा वापरून तयार केलेले खुशखुशीत आवरण आणि आतमध्ये सुक्या मेव्याचे समृद्ध सारण, ही करंजी चवीला अत्यंत अप्रतिम लागते. सकाळी गरम कॉफी किंवा चहाच्या सुडक्यासोबत ही ताजी करंजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चला तर मग, जाणून घेऊया ही लज्जतदार ड्रायफ्रुट्स करंजी बनवण्याची सोपी रेसिपी-