Recipe : झटपट बनणारा दूधी हलवा; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dudhi halwa or lauki halwa

Recipe : झटपट बनणारा दूधी हलवा; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी

अनेकांना दुधीभोपळ्याची भाजी आवडत नाही. घरी ती भाजी केली किंवा आणली की, आपण नाक मुरडायला सुरुवात करतो. मात्र दुधीभोपळा हा औषधी असून तो आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मात्र ही भाजी चवीला लागत नाही म्हणून आपण खाणे टाळतो. दरम्यान, या दुधीच्या भाजीला चविष्ट बनवण्यासाठी काही सोप्या पद्धतीच्या रेसिपीही उपलब्ध आहेत. मात्र आज तुमच्यासाठी दुधीच्या हलव्याची रेसिपी सांगणार आहोत. जी खायला तर रुचकर आहेच, शिवाय तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया या रेसिपीबद्दल... (dudhi halwa of lauki halwa)

साहित्य..

दुधी हलवा बनवण्यासाठी दुधी, तूप, काजू, बदाम, खवा, मनुका, साखर, दूध, मलई लागणार आहे. या सर्व गोष्टी अगदी सामान्य असून सहजरित्या तुमच्या स्वयंपाक घरात उपलब्ध असतात. चला तर मग पाहुया दुधी हलव्याची सोपी रेसिपी..

हेही वाचा: Food Tips : टेस्टही अन् चवीला बेस्टही, जाणून घ्या रेसिपी

कृती :

दूधी हलवा बनवण्यासाठी प्रथम दूधीची साल काढून तो किसनीने किसून घ्या. आता एका कढईत तूप टाकून त्यात काजू, बदाम, आणि मनुके तळून घ्या. यानंतर ते एका बाजूला प्लेटमध्ये काढून ठेवा. आता कढईत उरलेल्या तूपात दूधी टाकून तोही तळून घ्या. त्यानंतर त्यात दूध घालून घट्ट होईपर्यंत शिजवा. आता या मिश्रणात खवा घालून ते सर्व एकत्र करुन मिसळून घ्या.

शक्य झाल्यास आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बाजारातील घरी बनवलेला कोणताही खवा यामध्ये टाकू शकता. या रेसिपीमध्ये आम्ही बाजारातील खवा वापरला आहे. खवा नीट मिक्स करून मिश्रण घट्ट व्हायला लागल्यावर त्यात वेलची पूड टाका आणि पुन्हा एकदा मिक्स करा. तुमचा दूधी हलवा तयार आहे. आता तो एका प्लेटमध्ये काढून घ्या. सर्व तळलेल्या ड्रायफ्रुट्स किसून ते त्या हलव्यावर टाका. नंतर गरम गरम सर्व्ह करा.

हेही वाचा: सायंकाळच्या चहासोबत नाश्त्याची तयारी करताय?, झटपट तयार होणारी रेसिपी आजच ट्राय करा

Web Title: Dudhi Halwa Of Lauki Halwa How To Cook And Make Easy Recipe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..