Recipe: स्वादिष्ट दम आलूची भाजी कशी तयार करावी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dum Aloo Curry Recipe

Recipe: स्वादिष्ट दम आलू भाजी कशी तयार करावी?

झणझणीत काही तरी खावं वाटतं असले ,अगदी हॉटेलमध्ये खातो तसं तर, आम्ही आज तुम्हाला जी दम आलू रेसिपी सांगणार आहोत, ती नक्की ट्राय करुन बघा..

साहित्य:

आठ ते दहा मध्यम उकडलेले आलू

दोन मध्यम टोमॅटो

दोन कांदे

हिरवी मिरची पेस्ट

आले लसूण पेस्ट

काजू

जिरे

खडा मसाला: हिरवी वेलची, दालचिनीची काडी, लवंग, ब्लॅक पेपर, हिंग

कोथिंबीर पेस्ट

दोन चमचे गरम मसाला पावडर

एक चमचा वाळलेल्या मेथीची पाने

मीठ

हळद

एक चमचा लाल तिखट

तिन चमचे तेल

हेही वाचा: Shravan food Recipe: घरातील सदस्य बीट खात नाहीत? बनवून बघा हे हेल्दी आणि टेस्टी बीटरूट कटलेट..

कृती:

सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेले टोमॅटो,कांदे आणि चार ते पाच काजू एकत्र वाटून घ्यावे. यानंतर एक हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट एकत्र करुन घ्यावी.

फोर्कच्या मदतीने आलूना छिद्रे करून घ्यावेत.आणि नंतर आलू उकडायला टाकावे आलू शिजले की त्याचे साल काढून घ्यावे.

नंतर कांदा काजूची पेस्ट आणि अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. यानंतर सर्व मसाल्यांमध्ये बटाटे योग्य पद्धतीने मिक्स करून घ्यावे. यानंतर पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर बटाटे दोन मिनिटे फ्राय करा. फ्राय केलेले बटाटे वेगळे ठेवावे. आता पॅनमध्ये आणखी थोडं आणखी तेल ओता. तेलात चिमूटभर हिंग, एक चमचा जिरे, एक मोठा वेलदोडा, दोन ते तीन काळी मिरी, एक लवंग आणि दालचिनीचा एक तुकडा फ्राय करा. यानंतर मिरची आणि आल्याची पेस्ट देखील घालावी. मिश्रण एक ते दोन मिनिटे शिजू द्यावे यानंतर मिश्रणात टोमॅटोची पेस्ट मिक्स करावी.भाजीचा रस्सा घट्ट होईपर्यंत सामग्री शिजवा

चार ते पाच मिनिटांनंतर मिश्रणात अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, दोन चमचे धणे पूड आणि कसूरी मेथीची पावडर मिक्स करावी. चवीनुसार मीठ घालून सामग्री नीट शिजवून घ्या. यानंतर बटाट्यांच्या मिश्रणाचाही त्यात समावेश करावा. आता दोन चमचे गरम मसाला घालून रस्सा घट्ट होईपर्यंत भाजी शिजू द्यावी. स्वादिष्ट भाजी तयार आहे.तुम्ही ही दम आलुची भाजी पोळीसोबत किंवा तंदुरी रोटीसोबत खाऊ शकता.

टिप- बाजारात दम आलु भाजी करण्यासाठी लहान आलू उपलब्ध असतात.