

Boiled Egg Fry Recipe
Sakal
easy boiled egg fry recipe for breakfast: रोज एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन तुम्हालाही कंटाळा आलाय का? ब्रेड-बटर, पोहे किंवा उपमा यापेक्षा काहीतरी वेगळं, झटपट अन् पौष्टिक हवंय का? मग Boiled Egg Fry Recipe तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरू शकतो. अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. जे शरीराला ऊर्जा देतात आणि दिवसभर ताजंतवानं ठेवतात. हा एग फ्राय फक्त 15 मिनिटांत तयार होतो, त्यामुळे ऑफिस, कॉलेज किंवा शाळेला जाण्याची घाई असली तरी नाश्त्या कमी वेळेत तयार होतो. कमी साहित्य, सोपी पद्धत आणि जबरदस्त चव हे रेसिपीचे वैशिष्ट्य आहे. मसाल्यांचा योग्य मेळ अंड्याला अधिक चविष्ट बनवतो आणि नाश्त्यात वेगळा स्वाद देतो. हा पदार्थ बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.