

Quick Cheese Omelette Sandwich Recipe for a Perfect Sunday Breakfast
sakal
Weekend Special Breakfast Recipes: रविवारची सकाळ म्हणजे एकदम रिलॅक्स मूड असतो, ना कुठे जायची घाई, ना अलार्मचा त्रास. थोडं उशिरा उठून, शांतपणे किचनमध्ये जाऊन काहीतरी गरमागरम बनवण्याची मजा काही औरच असते. त्यातही बऱ्याचजणांना अंड्याचं काहीतरी हटके आणि नवीन बनवायची इच्छा असते. कारण यामुळे दिवसातला काही प्रमाणात तरी प्रोटीनचा साठा पूर्ण होतो. तेव्हा चीज ऑमलेट सँडविच बेस्ट उपाय ठरतो.