
कोल्हापूर : सकाळच्या पोटभर केलेल्या नाश्त्याला खूप महत्त्व दिले जाते. त्यामुळे सकाळी नाश्ता करणे सोडू नये. परंतु सकाळी पोटभर नाश्ता करणे कधीकधी शक्य नसते. तुमच्या व्यस्त कामातून वेळ काढून तुम्ही दररोज पौष्टिक नाष्टा करणे शरीरासाठी उत्तम असते. सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे गरजेचे असते. परंतु काही वेळा हे पदार्थ तुम्हाला उपलब्ध होत नाही. परंतु काही वेळा सामान्य गोष्टीपासून तुम्ही उत्तम आणि पौष्टिक नाश्ता तयार करु शकता. ज्या प्रकारे तुम्ही ब्रेडचा उपयोग टोस्ट बनवण्यासाठी करता तसेच या ब्रेड स्लाइसचा उपयोग तुम्ही स्वादिष्ट उत्तपम बनवण्यासाठीही करू शकता. ही एक परफेक्ट पौष्टिक रेसिपी आहे.
कृती - एका पॅनमध्ये तेल गरम करा. मंद गॅस आचेवर त्यामध्ये आलं आणि सुंठ घालावी. हिरवी मिरची, चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे. नंतर त्यात टोमॅटो, गाजर, शिमला मिरची टाकून थोडा वेळ शिजू द्यावे. ही परताताना असताना की जास्त कुरकुरीत होईल यासाठी काळजी घ्यावी. उपलब्ध भाज्या एकत्र परतून घ्याव्या. मीठ, तिखट, धने पावडर याचे मिश्रण करून पुन्हा एकदा काही सेकंदांसाठी ते मंद आचेवर शिजवून, परतून घ्यावे. हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावे.
ब्रेडच्या स्लाइस घेऊन त्या पिसुन बारीक करुन घ्या. एका वाटीत थोडासा रवा घ्यावा. दही घेऊन ते तुकडे त्यामध्ये मिक्स करावे. हे संपूर्ण मिश्रण एकत्र चांगले मिक्स करुन घ्या. यात आवश्यक तेवढे पाणी आणि मीठ घालावे. आता तुम्ही परतून घेतलेली सब्जी त्यामध्ये मिक्स करावी. दुसरा पॅनमध्ये तूप सोडावे आणि या मिश्रणातील एक पोळी तव्यावर गोलाकार पसरावी. नंतर त्यावर झाकण ठेवावे आणि मंद आचेवर शिजवून घ्यावे. बाकी उरलेल्या पीठाचे असेच उतपम बनवुन घ्यावेत. गरमागरम उतपम चटणी सोबत सर्व्ह करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.