esakal | चैत्र नवरात्रीला आवडीच्या फळांपासून बनवा लस्सी; जाणून घ्या रेसिपी

बोलून बातमी शोधा

easy recipe of fruit lassi for chaitra navratri special recipe for women

सोप्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या या चविष्ट लस्सींचा किंवा ज्यूसच्या आपण रेसिपी पाहणार आहोत..

चैत्र नवरात्रीला आवडीच्या फळांपासून बनवा लस्सी; जाणून घ्या रेसिपी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आपल्या देशात अनेक सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. यावेळी चैत्र नवरात्री येत आहे. 13 एप्रिलपासून ते 21 एप्रिलपर्यंत चैत्र नवरात्री सुरू राहणार आहे. दुर्गामाता सोबत जोडलेले या सणात नऊ दिवस देवीची विविध रूपातील पूजा बांधली जाते. नवरात्रीचे हे दिवस शुभ मानले जातात. त्यामुळे या दरम्यान लोक मांस, दारू, कांदा, लसूण अशा पदार्थांचे सेवन करत नाही. याव्यतिरिक्त सात्विक भोजनाला पसंती देतात. ज्यामध्ये बटाटा, साबुदाणा यांचा समावेश असतो.

सोबतच दही, दूध अशा पदार्थांचाही जोड असते. या दिवसांत बहुतेक लोक व्रतस्थ असतात. त्यामुळे उपासादरम्यान काय खावं किंवा स्वतःला हायड्रेड कसं ठेवण गरजेचे असते. त्यामुळे या मोसमातील फळांचा वापर तुम्ही यावेळी वापर करू शकता. फळांचा वापर करून तुम्ही हेल्दी लस्सी किंवा ज्युस बनवू शकता. सोप्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या या चविष्ट लस्सींचा किंवा ज्यूसच्या आपण रेसिपी पाहणार आहोत..

केळीची लस्सी -

या लस्सीमध्ये तुम्हाला दही, केळ आणि अक्रोड याचे गुडनेस मिळते. तीळ या लस्सीचा स्वाद वाढवण्यासाठी मदत करते. यामध्ये साखर आणि मध यांचा वापर केलेला असतो. उपवासा दरम्यान पाण्याऐवजी हे उत्तम पेय आहे.

चिकू लस्सी -

ही एक झटपट तयार होणारी स्वादिष्ट लस्सी आहे. यामध्ये चिकू, दही, दूध, वेलदोडे यांचा वापर केलेला असतो. त्यानंतर काहीच तासाने तुमचे पोट भरले आहे असे तुम्हाला वाटेल.

स्ट्रॉबेरी लस्सी -  

तुमच्यापैकी असे बरेच लोक असतील ज्यांना स्ट्रॉबेरी पसंत असेल. त्यामुळे स्ट्रॉबेरीची प्युरी तयार करून यामध्ये दही, साखर आणि बर्फ घालून हे मिश्रण एकत्र करून घ्यावे. आणि तयार झालेल्या मिश्रणात स्ट्रॉबेरी घालून लस्सी तयार करावी.

आंबा लस्सी 

आंबा हा फळांचा राजा आहे. बर्‍याच लोकांच्या पसंतीस तो उतरतो. त्यामुळे यापासून तुम्ही एक उत्तम लस्सीचा प्रकार बनवू शकता. त्यासाठी यामध्ये दही, बर्फ, साखर, सुकलेला पुदिनाही घालून आंब्याची लस्सी तयार करु शकता.