esakal | 30 मिनिटांत घरीच बनवा स्पंजी रसगुल्ले; सोपी रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

30 मिनिटांत घरीच बनवा स्पंजी रसगुल्ले; सोपी रेसिपी

30 मिनिटांत घरीच बनवा स्पंजी रसगुल्ले; सोपी रेसिपी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : आजची फेमस आणि सर्वांना आवडणारी रेसिपी म्हणजे रसगुल्ला. रसगुल्ला कुणालाही पसंत असतोच. अनेकजणांना हा पदार्थ आवडतो. (how to make rasgulla at home easily) हा पदार्थ पाहिल्यानंतर लहान मुलांसह मोठ्यांच्याही तोंडाला पाणी सुटते. परंतु बरेच लोक हा पदार्थ बाहेरून विकत आणून खातात. (how to make a rasgulla) परंतु याला घरीही तुम्ही तितकेच्या सोप्या पद्धतीने तयार करु शकता. तुम्ही या रेसिपीला घरी बनवण्यासाठी नक्की ट्राय करु शकता. रसगुल्ला ही लोकप्रिय आणि स्वादिष्ट, क्लासिक भारतीय मिठाई मध्ये प्रसिद्ध आहे. (rasgulla tasty recipe) लॉकडाऊन दरम्यान तुम्ही दूध, लिंबू, साखर यांच्या मदतीने हे स्वादिष्ट रसगुल्ले बनवू शकता. असेच झटपट बनणारे सर्वांना आवडरे रसगुल्ला रेसिपी आपण पाहणार आहोत. (how to make rasgulla in hindi)

हेही वाचा: हिरवी मिरची स्टोअर करण्यासाठी काही सोप्या टिप्स

बनवण्याची पद्धत

दुधाला एका भांड्यामध्ये घेऊन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्याला उकळून घ्या. त्यानंतर यात लिंबूचा सर घाला आणि नंतर ते दुध फाटून जाईल. त्यानंतर त्यातील पाणी वेगळे करा आणि एका कपड्यात झाकून ठेवा. लिंबूचा स्वाद काढण्यासाठी त्याला थंड पाण्यामध्ये ठेवा. तुम्ही लिंबु ऐवजी सिरकाही वापरू शकता. त्यानंतर याला कापडामध्ये बांधून कमीत कमी तीस मिनिटांसाठी लटकून ठेवा. त्यानंतर तयार मिश्रणाला ग्लासमध्ये काढून घ्या. मखमली, मऊ पीठ होत नाही, नरम मैद्याच्या पीठाप्रमाणे होत नाही तोवर किमान दहा मिनिटांसाठी मळत रहा. त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. एका भांड्यामध्ये पाच कप पाणी घालून त्यामध्ये दोन कप साखर आणि इलायची पावडर घाला. हे मिश्रण उकळून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा रोज वॉटर घालून मंद आचेवर उकळत ठेवा. त्यानंतर तयार गोळे यामध्ये सोडून द्या. 10 मिनिटांसाठी मिश्रण उकळू द्या. वारंवार हे मिश्रण हलवत रहा. जेणेकरून रसगुल्ले सगळीकडून शिजतील. शिजलेले रसगुल्ले गरम-गरम पाकात घाला. तुमचे रसगुल्ले तयार आहेत. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून तुम्ही थंड केलेले रसगुल्ले खाऊ शकता.