हिरवी मिरची स्टोअर करण्यासाठी काही सोप्या टिप्स

मिरचीच्या स्वादावर परिणाम होणार नाही, शिवाय ही लवकर खराबही होणार नाही
हिरवी मिरची स्टोअर करण्यासाठी काही सोप्या टिप्स

कोल्हापूर : तुम्ही नेहमी हे पाहिल असेल की हिरवी मिरची खूप जलद गतीने लाल पडते. (chilli and hacks) तुम्ही जरी तिला फ्रीजमध्ये स्टोअर केलात तरीही एका आठवड्याच्या आत याचा कलर आणि स्वाद बदलतो. (chilli storage) हिरव्या मिरचीला ही समस्या नेहमी असते. यामुळे तुम्ही अधिक प्रमाणात ही मिरची घेऊन ठेवू शकत नाही. (hacks for green chilli) परंतु असा कोणता उपाय आहे का ज्यामुळे हिरवी मिरची स्टोअर करणे सोपे होईल. (chilli and storing) ते खूप दिवसानंतर खराब होणार नाही, यासंबंधी आज आम्ही तुम्हाला एक ट्रीक सांगणार आहोत. ज्यामुळे मिरचीच्या स्वादावर परिणाम होणार नाही, शिवाय ही लवकर खराबही होणार नाही. (How To Store Chilli Properly)

मिरची दोन आठवड्याच्या आत वापरायची असल्यास अशी करा स्टोअर

सुरुवातीला हिरवी मिरची स्वच्छ पाण्याने धुऊन अर्ध्या तासासाठी तिला थंड पाण्यात ठेवा. यानंतर पाण्यातून बाहेर काढून त्याची देठ काढून घ्या. जर एखादी मिरची खराब असेल तर ती बाजूला करा आणि चांगल्या मिरच्या एकत्र करा. आता या मिरचीतील पाणी काढून त्या एका पेपरवरती किंवा पेपर टॉवेलवर सुकवून त्यानंतर त्यांना एका टिशू पेपरमध्ये रॅप करा. आता त्यांना झिपलॉकच्या सहाय्याने फ्रिजमध्ये ठेवा. ज्यामुळे तुमची मिरची दोन आठवड्यांसाठी ताजी राहील.

हिरवी मिरची स्टोअर करण्यासाठी काही सोप्या टिप्स
काय सांगता! चक्क रत्नागिरीत आढळला पांढरा कावळा

दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस मिरची स्टोअर करायची असल्यास

जर तुमची मिरची सुकलेली असेल तर तिला क्लींग फिल्म रॅपच्या ग्लास प्लेटमधून ट्रान्सफर करता येईल. या ट्रे मध्ये तुम्ही मिरची रॅप करुन ठेवू शकता. आणि यावरती ही क्लींग फिल्म रॅप करून ठेवता येतो. यानंतर काही वेळासाठी याला फ्रीजरमध्ये ठेवू शकता. फ्रीजरमधून बाहेर काढून एका बॅगमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. त्याच्या साहाय्याने या ट्रेमधील एक्स्ट्रा हवाही तुम्ही बाजूला करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com