esakal | भरल्या कारल्याची सोपी रेसिपी; जाणून घ्या खास टिप्स 

बोलून बातमी शोधा

easy recipe of karela special tips to remove bitterness of recipe in kolhapur

भरल्या कारल्याची ही रेसिपी टेस्टी आणि हेल्दी आहेच शिवाय तुम्ही मुलांनाही ही खायला घालू शकता.

भरल्या कारल्याची सोपी रेसिपी; जाणून घ्या खास टिप्स 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : तसं पाहायला गेलं तर कारल्याची भाजी कडू असल्याने बरीच लोक याला पसंती देत नाहीत. परंतु आज आम्ही तुम्हाला भरल्या कारल्याची अशी रेसिपी सांगणार आहोत जी अजिबात कडू लागणार नाही. एकदा तुम्ही या प्रकारची रेसिपी करून पाहिली तर तुम्ही दरवेळी हीच रेसिपी बनवाल. भरल्या कारल्याची ही रेसिपी टेस्टी आणि हेल्दी आहेच शिवाय तुम्ही मुलांनाही ही खायला घालू शकता. ही टेस्टी रेसिपी तुम्ही एक वेळेस जरूर ट्राय करा.

साहित्य - 

  • करली - 6
  • लसुण - 5 ते 6
  • हरवी मिरची - 3
  • जीरे - 1 चमचा
  • शेंगदाणे - 25 ग्रॅम
  • कैरी - 1/2
  • पाणी - 3/2 कप
  • मीठ - 1 चमचा
  • तेल- 1 मोठा चमचा
  • चिरलेले कांदे - 2

कृती - 
 
सुरुवातीला कारले स्वच्छ धूवुन घ्या. आणि ते मधून चिरून त्यातील बिया वेगळ्या करा. मसाला बनवण्यासाठी लसूण, हिरवी मिरची, जिरे, शेंगदाणे आणि तेल घालून, कच्चे कैरी घालून एकत्र मिश्रण करून घ्या. आता सर्व कारल्यांना एकत्र पाण्यात टाका. हे मिश्रण मीठ घालून गरम करून घ्या. याचे स्टफिंग बनवण्यासाठी तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मसाले घालून ते भाजून घ्या. आता हा मसाला कारल्यांमध्ये भरुन उत्तम प्रकारे शिजवून घ्या. अशाप्रकारे तुमचा भरली कारली तयार आहेत.