esakal | साऊथ इंडियन स्पेशल वांग्याची चटणी; नक्की ट्राय करा
sakal

बोलून बातमी शोधा

साऊथ इंडियन स्पेशल वांग्याची चटणी; नक्की ट्राय करा

साऊथ इंडियन स्पेशल वांग्याची चटणी; नक्की ट्राय करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : वांग्यापासून बनवलेले (brinjal dish) पदार्थ हे लोकप्रिय भाजीमध्ये पकडले जातात. असे काही ठराविकत लोक आहेत ज्यांना वांग्याची भाजी किंवा वांग आवडत नाही. वांग्याची भाजी बनवण्याचे विविध प्रकार आणि रेसिपी आहेत. यापासून तयार होणाऱ्या प्रत्येक भाजीचा स्वाद वेगळा आहे. मसाला वांग्यापासून ते भरल्या वांग्यापर्यंत अनेक रेसिपी तुम्ही बनवू शकता. परंतु आज आम्ही तुम्हाला वांग्याची चटणी कशी बनवायची आहे हे सांगणार आहोत. ही चविष्ट तर असतेच शिवाय साउथ इंडियन डीशमध्ये (south indian dish) साधारणत: ही जास्त खाल्ली जाते. रोटी किंवा डोसा सोबत ही चटणी खाल्ली जाते. वांग्याची चटणी दोन प्रकारे बनवली जाते. काही लोक त्याला भाजून तर काही लोकं तुकडे करून कढीपत्ता, लाल मिरची, मसाले भाजून यामध्ये घालतात. चटणी तुम्हाला भरताप्रमाणेच वाटते. वांग्याच्या चटणीची सोपी रेसिपी आपण पाहूयात...

साहित्य -

 • 4 कप चिरलेली वांगी

 • 3 टेबल स्पून कनोला तेल

 • 2 टी स्पून कलौंजी

 • 2 टी स्पून जीरे

 • 1/4 कप कढीपत्ता

 • 1 1/2 कप टोमॅटो

 • 2 टी स्पून लाल तिखट

 • 2 टी स्पून हळद

 • चवीनुसार मीठ

 • 3/4 कप साखर

 • 1 कप सिरका

कृती -

कॅनोला ऑईल गरम करून त्यात कलौजी, जिरे घाला. तेल गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा, कडीपत्ता, टोमॅटो घालून भाजून घ्या. त्यानंतर लाल मिरची, हळद, मीठ आणि साखर घाला. आता यामध्ये वांगे घालून तीन ते चार मिनिटांसाठी शिजवून घ्यावी. त्यानंतर सिरका घालून मंद आचेवर दोन ते तीन मिनिटांसाठी झाकून ठेवा. गॅस पुन्हा चालू करून एकदा चेक करून घ्या. गॅसवरून खाली उतरवून थंड झाल्यावर ही चटणी खाऊ शकता.

loading image