esakal | फक्त 20 मिनिटांत बनवा स्प्राऊट पोहे; अशी आहे रेसिपी 

बोलून बातमी शोधा

easy recipe of poha tips cooking within 20 minutes as home in kolhapur

आज आपण स्प्राऊट पोहा ही रेसिपी पाहणार आहोत. जी एकदम सोपी आहे

फक्त 20 मिनिटांत बनवा स्प्राऊट पोहे; अशी आहे रेसिपी 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गरमीचे दिवस सुरू झाले आहेत. या दिवसांत काही हलकेफुलके खाण्याचा विचार असतो. जो नीट पचला जाईल. गरमीच्या दिवसांत सर्वात मोठी समस्या असते ती डायजेशनची आणि त्यामुळे लोक हलकफुलक खाण्यास पसंती देतात. तरी या दिवसात आपण अशी काही रेसिपीज बनवू शकतो ज्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. जी वेट लॉससाठीही उत्तम असेल आणि पचण्यास सोपी असेल. आज आपण स्प्राऊट पोहा ही रेसिपी पाहणार आहोत. जी एकदम सोपी आहे.


साहित्य - 
 

 • 1.5 कप पोहे
 • 1 कप स्प्राउट्स मुग
 • 1/4 कप बारीक चिरलेला कांदा
 • 1/4 कप बारीक चिरलेली शिमला मिरची
 • 1/4 कप बारीक चिरलेले गाजर
 • 1/4 कप हिरवे वटाणे
 • 1/4 कप बारीक चिरलेला टोमॅटो
 • 1/2 छोटा चमचा हळद
 • 1/2 छोटा चमचा मोहरी
 • 1 हिरवी मिरची
 • 10-12 कडी पत्ताची पाने
 • 1 छोटे चमचे लिंबू रस
 • चवीनुसार मीठ

कृती -

सुरुवातीला पोहे धुवून घ्या. आणि दहा मिनिटांसाठी वेगळे ठेवा. आता त्यामध्ये मोहरी, मिरची, कडीपत्ता आणि कांदा घालून ते शिजवून घ्या. कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये काही भाज्या आणि मूग घाला. त्यानंतर मीठ घालून दोन मिनिटांसाठी शिजवून घ्या. या मिश्रणात नंतर पोहे टाका आणि दोन ते तीन मिनिटांसाठी ते पुन्हा शिजवून घ्या. आता यामध्ये तुम्ही हवे असेल तर अगदी थोडे पाणीही टाकू शकता. गॅस बंद करून यावर लिंबाचा रस कोथिंबीर टाका. तुमची झटपट ही रेसिपी तयार आहे.