

तुमच्याही घरात रोज सकाळी "आज नाश्त्याला काय बनवायचं?" हा प्रश्न पडत असेल, तर हा सोपा आणि पौष्टिक पर्याय नक्की ट्राय करा. सत्तू, सुका मेवा आणि गुळापासून तयार होणारे हे हेल्दी लाडू केवळ चविष्टच नाहीत, तर शरीराला दिवसभरासाठी ऊर्जा देण्यासही मदत करतात. विशेष म्हणजे हे लाडू एकदाच बनवून ठेवल्यास अनेक दिवस नाश्त्याची चिंता मिटू शकते.