जळलेली भांडी पटकन साफ करण्यासाठी सोप्या टिप्स

काही मिनिटांमध्ये या भांड्यांची चमक आहे तशी ठेवायला मदत करतात
जळलेली भांडी पटकन साफ करण्यासाठी सोप्या टिप्स

कोल्हापूर : जेवण बनवणे ही एक कला आहे असं म्हटलं जात. परंतु तुम्ही या कलेमध्ये कितीही निपून असला तरीही कधीतरी किचनमध्ये तुमच्या हातून एखादी चूक घडतेच. यापैकीच एक चूक म्हणजे जेवण करतेवेळी काही वेळा चुकून भांड्यांच जळुन किंवा करपून जाणं. तुमच्या डेली रुटीनमध्ये किंवा धावपळीत गॅस वर शिजायला ठेवलेलं जेवण विसरून जातं. त्यामुळे ते भांडण करपू किंवा जळु शकते. यामुळे त्या जेवणाचा स्वाद खराब होतो. तसेच ते भांडे खराब होते. अशा करपलेल्या भांड्याला साफ करणं कठीण होऊन जाते. त्यामुळे आज आपण अशाच काही सोप्या टीप्स पाहणार आहोत. ज्या काही मिनिटांमध्ये या भांड्यांची चमक आहे तशी ठेवायला मदत करतील.

मिठाचा वापर

एखाद्या करपलेल्या किंवा जळलेल्या भांड्याला साफ करण्यासाठी मीठ एक प्रभावी साधन आहे. मीठामुळे अशी भांडी लवकर साफ होतात. यासाठी एका स्क्रब पेपरवर थोडं मीठ घ्या आणि आपल्या डिश साबण बर्तनने ते साफ करा. ही आयडिया यावर प्रभावीपणे काम करेल. तुमचं करपलेल भांड काही मिनिटांत साफ होऊन जाईल.

कोकचा वापर करा

करपलेल्या भांड्याला साफ करण्यासाठी एक सोपा उपाय आहे तो म्हणजे ब्लॅक कलरचे सॉफ्ट ड्रिंक. यासाठी तुम्ही कोकचा वापर करु शकता. एका भांड्यामध्ये कोक टाकून त्याला थोडे गरम होऊ द्या. यामधून बुडबुडे निघणे बंद झाले की त्याला गॅसवरून खाली उतरवून प्लास्टिक ब्रश किंवा स्क्रबने घासू शकता. ही ट्रिक फक्त ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठीच नाही तर स्टीलच्या भांड्यांसाठी उपयोगी पडते.

बेकिंग सोडा

भांड्यांचे जिद्दी काळे जळलेले डाग हटवणे मुश्कील असते. परंतु बेकिंग सोड्याचा वापर केल्यास तुम्ही हे सहजतेने करू शकता. यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट बनवा. या पेस्टला जळलेल्या भांड्यासोबत 15 मिनिटे पाण्यात भिजू द्या. पंधरा मिनिटानंतर या भांड्यांना स्वच्छ धुवून टाका.

टोमॅटो केचप

जळलेल्या स्टीलच्या भांड्याला टोमॅटो सॉसने काही मिनिटांत स्वच्छ केले जाऊ शकते. यासाठी टोमॅटोच्या सॉसला त्या जळलेल्या भांड्यावर लावा. रात्रभर त्याला भांड्यावर तसेच राहू द्या. सकाळी उठून स्क्रबच्या साह्याने हे भांडे साफ करा. तुम्ही पाहू शकता तुमचं भांडण हे चमकत असेल आणि याचे डागही निघून जातील.

लिंबूचा रस

सफाईच्या बाबतीत लिंबूला खूप महत्त्व दिलं जातं. बहुतेक अनेक डिशवॉशमध्ये लिंबूचा वापर केलेला असतो. भांडी स्वच्छ करण्यासाठी किंवा कपड्यांवर असलेले डाग कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. तसेच भांड्यांवर असलेले निशान किंवा डाग साफ करण्यासाठीही लिंबूच्या रसाचा फायदा होतो. भांड ज्या ठिकाणी जळले आहे, त्या ठिकाणी तुम्ही लिंबू घासू शकता. काहीच वेळानंतर तुम्हाला ते भांडण चमकल्याचे दिसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com