
नियमित तुळस खा! चार फायदे मिळवून मस्त जगा| Tulsi Health Benefits
तुळस आयुर्वेदात अतिशय महत्वाची मानली जाते. तुळस नियमित खाल्ल्याने अनेक आजारांपासून तुमचा बचाव होतो. तुळशीचे बीही आरोग्यासाठी (Health) चांगले असते. तुळशीचा चहा आणि तुळशीच्या पाणी नियमित प्यायल्याने तणाव (Stress) कमी होतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. तुळशीमध्ये आढळणारे घटक रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-वायरल, अँटी-फ्लू, अँटी-बायोटिक, अँटी-इंफ्लेमेटरी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, झिंक, कॅल्शियम आणि लोह असे महत्वाचे गुणधर्म असतात. हे गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जातात. तसेच तुळस खाल्याने (Food)आणखीही चार महत्वाचे फायदे मिळतात.
हेही वाचा: Diabetes असलेल्यांनी 'या' 6 पांढऱ्या पदार्थापासून राहा दूर
हे आहेत चार फायदे
तणाव कमी होतो- अनेक अभ्यासानुसार तुळशीचे पाणी नियमित प्यायल्याने तणाव कमी करण्यासाठी मदत होते. तुळस ही तुमचे मन शांत करते. पर्यायाने तणाव कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी फायद्याचे - वजन कमी करण्यासाठी तुळस खाणे चांगले मानले जाते. हे सुपर हेल्दी ड्रिंक तुमची चयापचय शक्ती वाढवतेच. शिवाय तुमच्या कंबरेचा घर योग्य आकारात करण्यास मदत करते.
हेही वाचा: किराणा ऑनलाईन मागवत असाल, तर हे वाचा!
रोगप्रतिकारक शक्ती वाढते- सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने तुमचा आजारापासून बचाव होतो. तसेच तुळशीचा रस रिकाम्या पोटी पाण्यात मिसळून प्यायल्याने सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो. शिवा. तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
सर्दी खोकला- तुळशीत अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-फ्लू, अँटी-बायोटिक गुणधर्म आढळतात. थंडीत सर्दी खोकला होऊ नये यासाठी त्याचा फायदा होतो.
Web Title: Eat Tulsi Regularly You Found 4 Health Benefits And Nutrients Value
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..