esakal | बंगाली स्टाईल एग तडका रेसिपी; नक्की ट्राय करा
sakal

बोलून बातमी शोधा

बंगाली स्टाईल एग तडका रेसिपी; नक्की ट्राय करा

बंगाली स्टाईल एग तडका रेसिपी; नक्की ट्राय करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : भारतीय पदार्थांचा स्वतःचा एक वेगळा स्वाद आहे. देशातल्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही पर्यटनासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी, फिरायला गेलात तर एक पहिली गोष्ट ते म्हणजे तेथील खाद्य संस्कृती. प्रत्येक राज्याची ही संस्कृती वेगळी आहे. ती लोकप्रिय आहे. जी आपल्या राज्यात येणाऱ्या पर्यटकांना नेहमी लक्षात राहते. उत्तर प्रदेशची कचोरी असेल, राजस्थानी दाल बाटी असेल, गुजराती ढोकला असेल किंवा पंजाबी दाल तडका असेल. प्रत्येक पदार्थ आपल्या आपल्या ठिकाणी पॉप्युलर आहेतच. अशीच एक बंगालची रेसिपी लोकप्रिय आहे. एग तडका रेसिपी. ही रेसिपी जास्त प्रमाणात धाब्यावर असते. आणि खास करून याला पंजाबमध्ये जास्त पसंती दिली जाते. जर तुम्ही बंगाली खाण्याची शौकीन असाल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करु शकता. तुम्हाला माहित अंड्याता उपयोग अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तुमच्या अंड्यांच्या रेसिपीमध्ये याचाही समावेश करून घेऊ शकता.

कृती -

दाल बनवण्यासाठी सामग्रीला तीन कप पाण्यात प्रेशर कुकरमध्ये घाला. डाळ शिजवून घ्या. आठ ते दहा मिनिटांमध्ये ती शिजून जाईल. कुकर थंड झाला की या मिश्रणात बटाटे मॅश करा. आणि डाळ मॅश करून घ्या. थोडसं भरड्या पद्धतीच हे मिश्रण राहिले पाहिजे याची काळजी घ्या.

मंद आचेवर एका पॅनमध्ये तेल सोडा. या मिश्रणात चिमूटभर मीठ घालून द्या. आणि डाळ सेट होत नाही तोपर्यंत त्याला ड्राय राहू द्या. आणि यानंतर ते फोल्ड करून घ्या.

या पॅनमध्ये शिल्लक राहिलेल्या तेलात आलं, लसुण 30 ते 40 सेकंदासाठी शिजवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालून दोन मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर टोमॅटो घाला आणि ते मिश्रण थोडं नरम होऊ द्या.

तीन चमचे पाण्यात सुकलेल्या मसाल्याची पावडर मिक्स करा आणि या सामग्रीत तेल घालून मसाला यापासून वेगळा होईपर्यंत शिजवून घ्या.

या मिश्रणात तुम्ही एक टेबल स्पून चिकन ग्रेव्ही असेल तर किंवा नसल्यास तुम्ही एमएसजी घालू शकता. त्यानंतर या मिश्रणात मॅश केलेली डाळ घाला आणि गॅस वाढवून ते शिजवून घ्या. दोन ते तीन मिनिटांत हे शिजून तयार होईल.

आता यामध्ये अंडे आणि घाला आणि ते हलवत राहा. अंडे उत्तम प्रकारे मिक्स झाले कि त्यामध्ये कसुरी मेथी घाला. या मिश्रणाचा सुगंधा आल्यानंतर एकदा चेक करून त्यामध्ये मीठ घाला. वरून चिरलेली कोथिंबीर आणि लोणी घालून पराठे किंवा रोटी सोबत तुम्ही खाऊ शकता.

बंगाली स्टाईल एग तडका रेसिपी नक्की ट्राय करा

तुमच्या अंड्यांच्या रेसिपीमध्ये याचाही समावेश करून घेऊ शकता.