esakal | पावसाळ्यात बनवा चमचमीत वांगी भजी! जाणून घ्या रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यात बनवा चमचमीत वांगी भजी! जाणून घ्या रेसिपी

पावसाळ्यात बनवा चमचमीत वांगी भजी! जाणून घ्या रेसिपी

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

पावसाळ्याला सुरवात झाली आहे. बाहेर मस्त पाऊस पडत आहे. अशावेळी मस्त गरमागरम खाण्याची इच्छा होते. अशावेळी मग चहा आणि भजी हवीतच, है ना. भजीचे अनेक प्रकार आहेत त्यातील वांगी भजी कशी बनवायची त्याची रेसिपी जाणून घेऊयात.

हेही वाचा: पावसाळ्यात कुरकुरीत कोबी भजी बनवा घरी; 'ही' आहे सोप्पी रेसिपी

साहित्य:

- कमी बिया असलेली मध्यम किंवा मोठी वांगी

- तांदळाचे पीठ २ ते ३ चमचे

- चवीपुरते मीठ

- हळद पाव चमचा

- मसाला १ चमचा

- तळण्यासाठी तेल

हेही वाचा: स्वादिष्ट कुरकरीत पालक भजी, बनवा घरच्या घरी

कृती :

-

वांगी धुवून त्याच्या गोल थोड्या पातळ चकत्या पाडा.

- चकत्यांवर मिठ, हळद, मसाला टाका

- थोडेसे पाणी शिंपडून जिन्नस चांगले कापांवर एकजीव करा.

- एका डिश मध्ये तांदळाचे सुके पीठ घेऊन त्यात हे काप घोळा.

- तवा चांगला तापवून, तेल सोडून हे काप मध्यम आचेवर तळा.

- हे लगेच शिजतात त्यामुळे ३-४ मिनीटांनी उलट करून परत थोडे तेल तव्याभोवती सोडायचे व थोडा वेळ शिजून द्यायचे.

- हे तळलेल्या वांग्याचे तुकडे म्हणजे वांग्याची भजी

- तांद्ळ्याच्या पिठाच्या ऐवजी बेसन ही वापरु शकता

- तेल आधीच जास्त घालू नका कारण तांदळाचे पीठ तेल लगेच शोषून घेते.

- भाकरी व चपाती बरोबरसुध्दा एकदम छान लागते

loading image