esakal | शाबूदाना मोकळा करण्यासाठी 'या' टिप्स वापरा
sakal

बोलून बातमी शोधा

shabudana

शाबूदाना मोकळा करण्यासाठी 'या' टिप्स वापरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: आपल्याकडे उपवासाला साबूदाना खाल्ला (sabudana recipe) जातो. तसेच बऱ्याच जणांचा साबूदाना हा आवडता पदार्थ आहे. साबूदान्याचे विविध रेसिपी करता येतात. पण याची एक अडचण म्हणजे तो भिजवण्यात पाणी कमी किंवा जास्त झालं तर तो भातासारखा चिकट होऊन जातो. (Hacks For Sabudana) यामळे त्याची चवही बदलते. चला तर मग जाणून घेऊया की शाबूदाना मोकळा-मोकळा होण्यासाठी काय करता येईल. (sabudana cooking hacks)

१. 'एवढं' पाणी घाला-

बऱ्याच जणांना प्रश्न असतो की शाबूदाना भिजवताना नेमके पाणी किती घालायचे ते. ज्यामुळे शाबूदाना जास्त चिकट होणार नाही आणि मोकळा राहील. (cooking Hacks For Sabudana)

- पहिल्यांदा शाबूदाने व्यवस्थित धुवून घ्या पण मॅश करू नका.

- नंतर संपूर्ण शाबू भिजेल एवढे पाणी त्यात टाका. सर्व शाबूदाने पाण्यात भिजतील याची काळजी घेतली पाहिजे.

२. जर तुम्ही मोठा साबू घेत असाल तर-

जर मोठा साबू घेत असाल तर ते भिजण्यासाठी वेळ लागतो आणि त्यास रात्रभर भिजवून ठेवले तर ते चांगले होईल. जर रात्रभर भिजवणे शक्य नसल्यास ते कमीतकमी 3-4 तास भिजू द्या. यानंतर, ते तयार करण्यापूर्वी त्यास पंख्याखाली ठेवा. त्यातून अतिरिक्त पाणी निघून जाईल.

३. झटपट साबूदाने करायचे असतील तर-

कधीकधी तुम्ही शाबू भिजवायला विसरलात तर चिंता करू नका. कारण तुम्हाला झटपट शाबूदाना करायचा असेल तर तुम्ही शाबू कोमट पाण्यात भिजू घालू शकता. शाबू पाण्यात भिजू घातल्यानंतर त्यावर झाकण ठेवू नका नाहीतर ते चिकट होईल.