

Farali Pattice Recipe: Crispy Fasting Snack for Navratri
esakal
Navratri Upvas Special Farali Pattice: नवरात्रीचे उपवास असोत किंवा इतर कोणतेही धार्मिक व्रत, उपवासाच्या दिवशी दररोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी तोंडाला चव आणणारा आणि पोट भरणारा काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा असेल, तर 'फराळी पॅटिस' (Farali Pattice) हा एक उत्तम पर्याय आहे. मूळचा गुजराती खाद्यसंस्कृतीतील हा पदार्थ मुंबईसह देशभरातील मिठाईच्या दुकानांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
वरच्या बाजूने कुरकुरीत बटाट्याचे आवरण आणि आतमध्ये ओले खोबरे, शेंगदाणे, काजू, मनुके यांचे गोडसर, चवदार सारण ही या पॅटिसची खास वैशिष्ट्ये आहेत. उत्तर भारतीय 'आलू टिक्की'प्रमाणे दिसणारा हा पदार्थ चवीला मात्र अगदी वेगळा आणि हलका-फुलका असतो. घरच्या घरी हॉटेलसारखे कुरकुरीत फराळी पॅटिस कसे बनवावे, याची सविस्तर आणि सोपी कृती खालीलप्रमाणे आहे-